मराठी बातम्या /बातम्या /religion /

भावाच्या रक्षणासाठी दोघी बहिणींनी बनवली स्मार्ट राखी; भाऊ अडचणीत असतील तेव्हा वाजणार अलार्म

भावाच्या रक्षणासाठी दोघी बहिणींनी बनवली स्मार्ट राखी; भाऊ अडचणीत असतील तेव्हा वाजणार अलार्म

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (आयटीएम) गीडा या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी पूजा यादव आणि फार्मसीची विद्यार्थिनी विजया रानी ओझा यांनी ही स्मार्ट राखी तयार केली आहे.

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : भारत हा जसा प्रचंड लोकसंख्येचा देश आहे, सर्वांत मोठ्या लोकशाही देशांतला एक देश आहे तसाच तो उत्सव आणि सणांचा, विविध संस्कृतींचा देश आहे. भारतातील संस्कृती पहायला, अनुभवायला जगभरातून प्रवासी येत असतात. आपल्या हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्गचक्राला अनुसरून साजरे केले जाणारे विविध उत्सव. राखी पौर्णिमा हा त्यापैकीच एक. हिंदू संस्कृतीत अगदी रामायण, महाभारतासारख्या महान ग्रंथांमध्येही राखी पौर्णिमेचा उल्लेख आढळतो. रक्षा बंधन म्हणजे बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याचं औक्षण करते. भाऊ आयुष्यभर तिला साध देऊन तिचं रक्षण करण्याचं वचन तिला देतो. त्याचबरोबर बहिणीची आवडती वस्तू तिला भेट देतो. या राखीच्या धाग्यात रक्षणाचं वचन दिलेलं असतं. अनेकदा भावांनी आपल्या बहिणींचं रक्षण करण्याकरता प्राणांची बाजी लावल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भही सापडतात. बहीण जसं भावाला राखी बांधते तसंच तिच्याही मनात असतं की आपल्या भाऊरायाला काहीही त्रास होऊ नये. त्यासाठीच ती त्याचं औक्षण करत असते. देवाकडे प्रार्थना करते की माझ्या भावाला सुरक्षित ठेव, त्याची भरभराट होऊ दे. जसा काळ बदलला तसं राहणीमान बदललं आता सगळं स्मार्ट झालंय. त्यामुळे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील दोन बहिणींनी आपल्या भावासाठी एक स्मार्ट राखी तयार केली आहे. उद्या (11ऑगस्ट 2022) देशभर राखी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या स्मार्ट राखीबाबतचं वृत्त ‘अमर उजाला’ वेबसाईटने दिलं आहे. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (आयटीएम) गीडा या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी पूजा यादव आणि फार्मसीची विद्यार्थिनी विजया रानी ओझा यांनी ही स्मार्ट राखी तयार केली आहे. या राखीचं नाव त्यांनी स्मार्ट मेडिकल सेफ्टी राखी असं ठेवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो त्यांनी या राखीवर लावला आहे. ही राखी दिसायला स्मार्ट आहेच पण तिच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस या विद्यार्थिनींनी बसवलं आहे. अडचणीच्या प्रसंगात किंवा अपघातच्या स्थितीमध्ये भावाने किंवा वापरणाऱ्याने त्या डिव्हाईसवरचं बटण दाबलं की त्यामध्ये सेव्ह केलेल्या फोन नंबरवर अलर्ट मेसेज जाईल. या अलर्टमध्ये भावाचा किंवा वापरणाऱ्याचा ब्लड ग्रुप, लोकेशन ही सर्व माहिती पाठवली जाईल. हे वाचा - Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश याबद्दल पूजा यादव म्हणाली, ‘मी आणि विजयाने तयार केलेल्या राखीतील डिव्हाइसमध्ये कुटुंबियांचा, अँब्युलन्स, डॉक्टर असे पाच महत्त्वाचे फोन नंबर सेव्ह करता येतील. भाऊ जर अडचणीत सापडला तर त्याने राखीतलं बटण दाबलं तर या पाच नंबरना जीपीएसच्या माध्यमातून अलर्ट मेसेज पाठवला जाईल.’ हे वाचा -  Rakshabandhan 2022: देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधन कोणत्या नावानं ओळखलं जातं विजया म्हणाली,‘अलर्टमध्ये भावाचा ब्लड ग्रुप असेल आणि त्याचं जीपीएस लोकेशन असेल त्यामुळे बहिणी, कुटुंबीय संबंधित व्यक्ती तातडीने भावाच्या किंवा वापरणाऱ्याच्या मदतीला धावून जाऊ शकतील. आम्ही तयार केलेली राखी सुंदर, आकर्षक, आणि स्मार्टही आहे. त्यामुळे ती बंधूरायाला उपयोगी ठरेल.’ हे वाचा -  Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (आयटीएम) गीडाचे प्रमुख डॉ. एन. के. सिंह म्हणाले, ‘आमच्या विद्यार्थिनींनी विकसित केलेली ही स्मार्ट राखी लवकरात लवकर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ भावांबरोबरच बहिणीही स्मार्ट झाल्या आहेत. त्यामुळे भावाबहिणींबरोबर राखीही स्मार्ट व्हायला हवी ना?, तेच या विद्यार्थिनींनी करून दाखवलं आहे.
First published:

Tags: Raksha bandhan, Religion

पुढील बातम्या