रिपोर्टर शिवाजी गोरे: दाभोळ रत्नागिरी, 7 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ चंडिका ग्रामदेवीचा होम पारंपारिक पद्धतीने हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी मध्यरात्री पेटविण्यात आला . या वेळी बहुसंख्य लोक उपस्थित होते, पारंपरिक पद्धतीने जिवंत कोंबडी होमच्या कळकीच्या देटाला लावून शीत बांधणे. ही प्रथा पार पडल्यानंतर होमा भोवती पालखी नाचवली जाते, खेळगडी ,मानकरी ,गावकरी पारंपारिक पद्धतीने होळी भोवती प्रदक्षिणा घालतात त्यानंतर मानकर्यांच्या हस्ते होम पेटवला जतो , हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती होमामध्ये ठेवलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून नागरिक आपापल्या घरी घेऊन जातात. होळीला बांधलेला कोंबडा मात्र जिवंत असतो .तो कोंबडा मानकरी घेवून जातात .
होळी पेटवली नंतर देवीच्या पालखीचा मुक्काम देवळात असतो, दुसऱ्या दिवशी पालखी पुन्हा भक्तांच्या भेटीला जाते. अशा पद्धतीने शिमगोत्सवातील पारंपारिक प्रथा जपली जात आहे.