मुंबई, 13 फेब्रुवारी: संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन. आज फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथूनंही आलेल्या पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. “श्री गजानन महाराज की जय” च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन निघालं आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी वयाच्या विसाव्या वर्षी गजानन महाराज प्रकट झाल्याचे सांगितले जाते. ते ज्या दिवशी दिसते तो दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो.
23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराजांचे दर्शन झाले असे सांगितले जाते. या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात. श्री गजानन महाराज यांचे जीवन आणि त्यांच्या जीनातील विविध पैलू ‘श्री गजानन विजय ग्रंथ’ आपल्याला पाहायला मिळतात. हा ग्रंध दासगणू महाराज यांनी लिहिले आहे. गजानन महाराज गूढी, परमहंस संन्यासी, जीवनमुक्त असे महान संत होते. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांनी दिलेला मंत्र. ‘‘पहिला ‘गण’ म्हणजे जीव किंवा जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात’. ‘बोते’ म्हणजे पहा,‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ ‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला, परमेश्वराला बघ.’ झुणका भाकर कांदा महाराजांचे आवडते पदार्थ आहे. गजानन महाराज जीवन चरित्रात अन्न व अन्नाचे महत्व सांगितले आहे. महाराज पत्रावळीवरची शिते खात असे, यावरून महाराज अन्नाला किती महत्व देत होते हे लक्षात येते. महाराज सांगायचे अन्नाची निंदा व हेळसांड कधीही करू नका. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)