मुंबई, 19 ऑक्टोबर : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी रमा एकादशी म्हणून ओळखली जाते. यावर्षी रमा एकादशी व्रत शुक्रवार, 21 ऑक्टोबर रोजी आहे. नावावरूनच अनेकांना माहीत असेल की, या एकादशी व्रताचे नाव भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीच्या नावाशी संबंधित आहे. माता लक्ष्मीला रमा असेही म्हणतात. रमा एकादशीच्या निमित्ताने व्रत आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी रमा एकादशीचा उपवास दिवाळीच्या चार-पाच दिवस आधी होतो. दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, पण त्याआधी रमा एकादशीलाही तुम्ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊ शकता. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख मृत्युंजय तिवारी यांनी रमा एकादशीविषयी माहिती दिली आहे. रमा एकादशी व्रताचे फायदे - 1. जो व्यक्ती रमा एकादशीचे व्रत पाळतो आणि पूर्ण विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला धन, वैभव आणि ऐश्वर्य प्राप्त होते. त्याच्यावर लक्ष्मीची कृपा राहते. 2. रमा एकादशी व्रताच्या कथेत असे सांगितले आहे की, जेव्हा राजकुमारी चंद्रभागेचे पती शोभन यांनी रमा एकादशीचे व्रत केले तेव्हा या व्रताच्या पुण्यपूर्ण परिणामामुळे त्यांना धन, संपत्ती, वैभवाने भरलेले राज्य देवपूर प्राप्त झाले. 3. रमा एकादशीचे व्रत करणार्याला ब्रह्महत्येसह सर्व पापांपासून मुक्ती मिळते. 4. भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की जो रमा एकादशी व्रत करतो किंवा रमा एकादशी व्रताची कथा ऐकतो तो मृत्यूनंतर विष्णुलोकात स्थान प्राप्त करतो. तो पापांमधून मुक्त होतो. रमा एकादशीला ब्रह्म-शुक्ल योग आणि शुक्रवारचा योगायोग - यावेळी रमा एकादशी व्रत शुक्रवारी आहे, जो नेहमीच देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवशी शुक्ल योग सकाळपासून सायंकाळी 5:48 पर्यंत आहे. तेव्हापासून ब्रह्मयोग सुरू होत आहे. हे दोन्ही योग शुभ फळ देणारे मानले जातात. शुक्रवारी रमा एकादशी व्रताच्या निमित्ताने भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. रमा एकादशी व्रताच्या पुण्यासोबतच शुक्रवार व्रताचा लाभही मिळेल. हे वाचा - दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत रमा एकादशी 2022 मुहूर्त - रमा एकादशी व्रताची सुरुवात तारीख: 20 ऑक्टोबर, गुरुवार, दुपारी 04:04 पासून रमा एकादशी उपवासाची समाप्ती तारीख: 21 ऑक्टोबर, शुक्रवार, संध्याकाळी 05.22 पर्यंत पूजेची शुभ वेळ: सकाळी 07.50 ते 09.15 पर्यंत
रमा एकादशी व्रताची वेळ - रमा एकादशीचे व्रत 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 06:26 ते 08:42 या वेळेत सोडले जाऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)