नवी दिल्ली, 28 मार्च : चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी म्हणजेच 30 मार्च, गुरुवारी भगवान विष्णूचा सातवा अवतार, मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांची जयंती साजरी केली जाईल. श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क राशीत झाला. चैत्र शुक्ल नवमी देखील या विशेष प्रसंगी साजरी केली जात आहे. या दिवशी चैत्र नवरात्री साजरी करणारे लोक कन्यापूजनही करतील. देवी दुर्गा आणि श्रीराम यांच्या उपासनेचा हा मिलाफ भाविक-भक्तांसाठी फलदायी ठरणार आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्यानं किंवा पवित्र ठिकाणी स्नान केल्यानं अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते.
आचार्य सर्वदानंद शर्मा यांनी सांगितले की, रामनवमीला पाच शुभ योगांचा मोठा संयोग होत आहे. या दिवशी केदार योग, गजकेसरी योग, पंच महापुरुष योग, बुधादित्य योग, गुरु आदित्य योग यांचा संयोग घडत आहे. याशिवाय गुरुवारी पुनर्वसु नक्षत्रासह स्वार्थ सिद्धी योग, गुरु-पुष्य योग आणि स्वार्थ अमृत सिद्धी योग तयार होतील. या संयोगात प्रभु श्रीराम, देवी सीता आणि हनुमान यांची पूजा-अर्चा केल्यानं कीर्ती, बल, बुद्धिमत्ता, ऐश्वर्य, प्रगती, परस्पर प्रेम, भौतिक सुखाचा विकास होतो, असे मानले जाते.
हत्ती आणि सिंह यांच्या संयोगाने गजकेसरी योग तयार होतो. हत्तीमध्ये गर्व नसलेली अफाट शक्ती आणि सिंहामध्ये असलेले अदम्य धैर्य आहे. त्याचप्रमाणे ज्याच्या कुंडलीत गजकेसरी योग बलवान असतो, तो आपली सर्व कार्ये आपल्या समंजसपणाच्या आणि अदम्य धैर्याच्या बळावर पूर्ण करतो, असे मानले जाते.
पूजा करण्यासाठी शुभ वेळ -
रामनवमीच्या दिवशी रामजन्मोत्सवाव्यतिरिक्त अनेक ठिकाणी ध्वजारोहणही केले जाते. यासाठी अमृत मुहूर्तः सकाळी 05:55 ते 07:26 पर्यंत. शुभ योग मुहूर्त: सकाळी 08:56 ते 10:27 पर्यंत. अभिजीत मुहूर्त: दुपारी 11:33 ते 12:21 पर्यंत. चार योग मुहूर्त: दुपारी 01:28 ते दुपारी 02:58 पर्यंत. लाभ-अमृत मुहूर्त: दुपारी 02:58 ते 05:57 पर्यंत आहे.
हे वाचा - मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.