सोलापूर, 21 एप्रिल : पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना आता सेवा-कार्य करता येणार आहे. येत्या आषाढीवारी यात्रेपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीची सेवा करण्याच्या संधीचा लाभ मिळणार आहे. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर पंढरपुरातही हा सेवेची संधी देण्याचा उपक्रम सुरू केला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची गुरुवारी बैठक झाली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत भाविकांना सेवेची संधी देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याची संधी मिळावी, अशी मागणी भाविकांनी केली होती. हे वाचा - लक्ष्मी कृपेचा वर्षाव! अक्षय्य तृतीयेला राशीनुसार सोने किंवा हे धातू खरेदी करा भाविकांच्या मागणीचा विचार समितीने केला आहे, आता येत्या आषाढी यात्रेपासून भाविकांना सेवा देता येणार आहे. या संदर्भात सविस्तर कृती आराखडा तयार करून त्यानुसार भाविकांना मंदिरांसह परिसरात मोफत सेवा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे वाचा - स्वत:चंच पिंडदान करून बनतात ‘नागा’; पहा कसा असतो नागा साधूंचा संपूर्ण जीवनप्रवास मंदिर समिती सांगेल त्यानुसार जे भाविक सेवा देण्यास तयार होतील, अशा भाविकांना ही वर्षभर सेवा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशा पद्धतीचं धोरण ठरवलं जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली. ज्या भाविकांना मंदिरात सेवा देण्याची इच्छा आहे, अशा भाविकांनी मंदिर समितीकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.