क्रमांक 8 हा क्रमांक 3 आणि क्रमांक 4 शी किती सुसंगत आहे? क्रमांक 3 : अंकशास्त्रानुसार, क्रमांक 8 आणि क्रमांक 3 च्या व्यक्तींना अंदाज बांधायला आवडतो. पण त्या एकत्र राहणं मोठं आव्हानात्मक असतं. कारण या व्यक्तींना एकमेकांच्या कामगिरीचा त्रास होऊ शकतो. क्रमांक 3 असलेल्या व्यक्ती कमालीच्या लवचिक असतात त्या सिस्टिम ड्रायव्हर असलेल्या क्रमांक 8 च्या व्यक्तीवर दबाव टाकू शकतात. क्रमांक 8 हा शनी ग्रहाचा तर क्रमांक 3 हा गुरुचा असल्याने क्रमांक 8 च्या व्यक्तींना क्रमांक 3 च्या व्यक्तींना सामावून घेणं खूप अवघड जातं. संभाषण शैलीतील फरकामुळे बऱ्याचदा या क्रमांकांच्या जोडप्यांमध्ये वाद होतात. पण त्यांनी ते टाळले पाहिजेत. परंतु, मीडिया, शैक्षणिक क्षेत्र, वित्त सल्लागार, हस्तकला, राजकीय क्षेत्रात क्रमांक 8 आणि क्रमांक 3 च्या व्यक्ती भागीदार असतील तर त्या आश्चर्यकारकदृष्ट्या यशस्वी ठरतात. आत्मविश्वास बळकट व्हावा आणि प्रगती व्हावी यासाठी या अंकाच्या व्यक्तींनी शरीरावर कोणत्याही प्राण्याची त्वचा धारण करणं टाळावं. शुभ रंग - जांभळा, शुभ वार - बुधवार, गुरुवार, शुभांक - 5, दान - या व्यक्तींनी एखाद्या आश्रमाला पुस्तकं आणि स्टेशनरी साहित्य दान करावं.
क्रमांक 4 : क्रमांक 4 आणि क्रमांक 8 हे अनुक्रमे राहू आणि शनी ग्रहाशी संबंधित असून ते एकमेकांविरुद्ध असतात आणि आव्हानं निर्माण करतात, हे आपण जाणतो. या क्रमांकांच्या व्यक्ती एकत्र येणं कठीण असलं तरी दुसरीकडे या व्यक्ती आर्थिक क्षेत्र आणि राजकारणात एकत्र आल्यास उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. हे दोन क्रमांक व्यक्तीला परिपूर्णतावादी आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ व्यवस्थापक बनवतात. या व्यक्ती वित्तीय व्यवस्थापन करण्यास सक्षम असतात आणि फिनिशरसारख्या वागतात. या क्रमांकावर जन्मलेल्या व्यक्ती अशक्य कामं सोप्या मार्गाने यशस्वी करण्यात सक्षम असतात. या क्रमांकाचे भागीदार अतिशय अनुकूल असणं गरजेचं आहे कारण त्यांच्यातील मानसिक हट्टीपणा त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी अडथळा बनू शकतो. ग्रहदोष घालवण्यासाठी हा दिवस अगदी उत्तम; शनी-सूर्य एकत्र आल्यानं संपेल अमंगळ क्रमांक 4 आणि क्रमांक 8 असलेल्या प्रेमी युगुलांना त्यांच्यातील प्रेम आणि आनंद कायम राहावा यासाठी वृत्तीतील कठोरता आणि मानसिक लवचिकता दूर करावी लागते. क्रमांक 4 आणि क्रमांक 8 असणाऱ्या व्यक्तींनी प्राण्यांना खायला द्यावे, त्यांची सेवा करावी आणि आयुर्वेददृष्ट्या योग्य आहार घ्यावा. यामुळे प्रतिकूल ऊर्जेमुळे निर्माण होणारे छोटे अडथळे कायमचे दूर होतील, असा सल्ला दिला जातो. या दोन्ही क्रमांकांच्या व्यक्तींनी ताण कमी करण्यासाठी हिरव्यागार वातावरणात थोडा वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण होईपर्यंत अतिशय शिस्तबद्ध जीवन जगावं. लोकप्रियता मिळवण्यासाठी महिलांनी धर्मादाय किंवा सामुदायिक कार्यात सहभागी होण्याची गरज आहे. क्रमांक 4 आणि क्रमांक 8 असलेले लोक उत्पादन उद्योगात व्यापारी असतील तर ते त्या उद्योगात अव्वल स्थानी असतात. राजकारणात असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या पक्षाचे आणि मतदारसंघाचे नेतृत्व करणं अनिवार्य आहे. नाहीत येत नकारात्मक विचार, मन प्रसन्न राहतं; गायत्री मंत्राचा जप करण्याचे फायदे शुभ रंग - निळा, राखाडी. शुभ वार - बुधवार, शुक्रवार. शुभांक - 5 आणि 6. दान - या क्रमांकाच्या लोकांनी जनावरांसाठी किंवा गरिबांना हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात.