जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / ग्रहदोष घालवण्यासाठी हा दिवस अगदी उत्तम; शनी-सूर्य एकत्र आल्यानं संपेल अमंगळ

ग्रहदोष घालवण्यासाठी हा दिवस अगदी उत्तम; शनी-सूर्य एकत्र आल्यानं संपेल अमंगळ

सूर्य-शनिदेव पूजा

सूर्य-शनिदेव पूजा

Ravi Yoga 2023: या दिवशी शनिवारी सूर्य आणि शनीची उपासना करण्याचा योग आहे. रवि योगात सूर्यदेवाचा प्रभाव अधिक असतो. यामुळे हा एक विशेष प्रभावी योग तयार होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 एप्रिल : रवि योग शुभ योगात गणला जातो. यावेळी 29 एप्रिल, शनिवारी रवियोग तयार होत आहे. दुपारपासून संपूर्ण रात्रभर रवि योग राहील आणि हा योग दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे. या दिवशी शनिवारी सूर्य आणि शनीची उपासना करण्याचा योग आहे. रवि योगात सूर्यदेवाचा प्रभाव अधिक असतो. यामुळे हा एक विशेष प्रभावी योग देखील आहे. हा योग सूर्याच्या ऊर्जेशी संबंधित आहे, यामुळे रवि योगात तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. या योगात काम करताना कोणतेही वाईट घडत नाही. अडथळे दूर करून शुभ परिणाम देणारा हा योग आहे. रवियोग केव्हापासून आहे आणि या योगात सूर्य-शनि दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात, याविषयी काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणि भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ. रवि योग 29 एप्रिल 2023 मुहूर्त - हिंदू कॅलेंडरनुसार, रवि योग 29 एप्रिल रोजी दुपारी 12.47 पासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी पहाटे 05.05 पर्यंत असेल. 29 एप्रिल ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी दुपारी 04:01 पर्यंत आहे. त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल. 29 एप्रिल 2023 रोजी गंण्ड आणि वृद्धी योग - 29 एप्रिल रोजी रवि योग व्यतिरिक्त गंण्ड योग आणि वृद्धी योग देखील तयार होत आहेत. गंड योग अशुभ मानला जातो, तर वृद्धी योग शुभ कार्यासाठी चांगला आहे. गंड योग पहाटेपासून 10:32 पर्यंत आहे, त्यानंतर वृद्धी योग सुरू होईल. जे दिवसभर असते.

News18लोकमत
News18लोकमत

शनिवार शुभ - शनिवारचा शुभ मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्त सकाळी 11.12 ते दुपारी 12.04 पर्यंत आहे. या मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास ते करू शकता. घरात पितृदोष, पूर्वज नाराज असल्यास या 5 गोष्टींवरून कळतं; लगेच बदला या गोष्टी शनि आणि सूर्यपूजा यांचे संयोजन - शनिवार 29 एप्रिल हा शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित असून सूर्यपूजेसाठी रवियोग चांगला मानला जातो. अशा स्थितीत शनिवारी रवि योगात सूर्य आणि शनीची उपासना करू शकता. पिता-पुत्राची पूजा केल्यानं शनिदोष आणि सूर्यदोषापासून मुक्ती मिळू शकेल. मे महिन्यात 3 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन; या 6 राशींना संपूर्ण महिना आनंदी सूर्य-शनि दोषावर उपाय - 1. रवि योगात सूर्यदेवाला लाल चंदन, गूळ आणि लाल फुले अर्पण करा. त्यावेळी सूर्यमंत्राचा जप करावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सूर्य बीज मंत्राचाही जप करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्य दोष दूर होईल. 2. शनिवारी शनि मंदिरात जाऊन छायादान करा. यामुळे शनिदोष, साडेसाती आणि इतर दुष्परिणामांपासून आराम मिळतो. 3. 29 एप्रिलला रवि योगात काळे तीळ आणि गहू दान करा. काळे तीळ शनिदेवासाठी आणि गहू सूर्यदेवासाठी. असं केल्यानं तुमच्या कुंडलीतून सूर्यदोष आणि शनिदोष दूर होऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Religion , vastu
  • First Published :
जाहिरात
जाहिरात