जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / चातुर्मास संपला तरी मुहूर्तांचा दुष्काळ; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नासाठी फक्त हे 8 शुभ मुहूर्त

चातुर्मास संपला तरी मुहूर्तांचा दुष्काळ; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नासाठी फक्त हे 8 शुभ मुहूर्त

लग्नाचे शुभ मुहूर्त

लग्नाचे शुभ मुहूर्त

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मिळून विवाहासाठी फक्त 08 शुभ मुहूर्त आहेत. शुक्र अस्तामुळे 24 नोव्हेंबरपासून लग्नाचे शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. या वर्षात उरलेल्या शुभ मुहूर्तांची माहिती पाहुया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 नोव्हेंबर : चातुर्मास संपल्यानंतर सर्व शुभ कार्यांना प्रारंभ झाला आहे. हे वर्ष संपायला आता दीड महिना बाकी आहे. या काळात लग्नासाठी काही शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मिळून विवाहासाठी फक्त 08 शुभ मुहूर्त आहेत. शुक्र अस्तामुळे 24 नोव्हेंबरपासून लग्नाचे शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. 30 सप्टेंबरला अस्त होणारा शुक्र 21 नोव्हेंबरला उगवणार आहे. 21 नोव्हेंबरला शुक्राच्या उदयामुळे अष्टलक्ष्मी राजयोग तयार होईल. द्रुक पंचांगानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या शुभ विवाह मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया. नोव्हेंबरमधील विवाह मुहूर्त- 24 नोव्हेंबर, गुरुवारचा दिवस शुभ योग: सर्वार्थ सिद्धी योग, सकाळी 06.51 ते संध्याकाळी 07.37 पर्यंत सुकर्म योग: दुपारी 12:20 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8:44 अनुराधा नक्षत्र: संध्याकाळी 07.37 पर्यंत, त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र शुक्रवार, 25 नोव्हेंबर सुकर्म योग : सकाळपासून 08.44 मिनिटे, नंतर धृती योग ज्येष्ठ नक्षत्र: सकाळपासून संध्याकाळी 05:21 पर्यंत, त्यानंतर मूल नक्षत्र 27 नोव्हेंबर, रविवार वृद्धी योग: रात्री 09:34 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 06:05 पर्यंत पूर्वाषाढ नक्षत्र: सकाळपासून दुपारी 12.38 पर्यंत, त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र रवि योग : सकाळी 06:53 ते दुपारी 12:38 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग: दुपारी 12:38 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:54 28 नोव्हेंबर, दिवस सोमवार वृद्धी योग: सकाळपासून संध्याकाळी 06.05 पर्यंत, त्यानंतर ध्रुव योग उत्तराषाढा नक्षत्र: पहाटेपासून ते सकाळी 10.29 पर्यंत, नंतर श्रवण नक्षत्र सर्वार्थ सिद्धी योग: दुसऱ्या दिवशी सकाळी 10.29 ते 06.55 पर्यंत रवि योग: दुसऱ्या दिवशी सकाळी 10.29 ते 06.55 पर्यंत डिसेंबरमध्ये शुभ विवाह मुहूर्त 02 डिसेंबर, शुक्रवार सिद्धी योग: दुसऱ्या दिवशी सकाळी 07.30 ते 05.51 पर्यंत उत्तर भाद्रपद नक्षत्र: सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 05.45 वा रवि योग : दुसऱ्या दिवशी सकाळी 06.57 ते 05.45 पर्यंत 07 डिसेंबर, बुधवार सिद्ध योग: सकाळपासून रात्री उशिरापर्यंत 02.55 मिनिटे कृतिका नक्षत्र: सकाळी 10.25 पर्यंत, नंतर रोहिणी नक्षत्र सर्वार्थ सिद्धी योग: संपूर्ण दिवस रवि योग: सकाळी 07:01 ते सकाळी 10:25 पर्यंत

News18लोकमत
News18लोकमत

08 डिसेंबर, गुरुवार दिवस साध्य योग: सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 03.12 पर्यंत रोहिणी नक्षत्र: सकाळपासून दुपारी 12.33 पर्यंत, नंतर मृगाशिरा नक्षत्र वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश 09 डिसेंबर, शुक्रवार शुभ योग: सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 03.44 पर्यंत, त्यानंतर शुक्ल योग मृगाशिरा नक्षत्र: पहाटेपासून दुपारी 02.59 पर्यंत, नंतर अर्द्रा नक्षत्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात