मुंबई,11 डिसेंबर: संपूर्ण ब्रह्मांडाची रचनाच एकंदर नऊ आकड्यांवर झाली असून ह्या प्रत्येक अंकावर विशिष्ट ग्रहाचा अमल असतो. तसेच प्रत्येक ग्रहाचा परिणाम ही भिन्न भिन्न असतो. अंक अक्षरांचा हा अद्भुत खेळ आहे. जन्म तारखेपासून प्रत्येक क्षणी तुमचे जीवन वेढून टाकणारे अंकित करणारे 0, 1 ते 9 हे अंक तुमच्याशी संवाद साधत असतात. धोक्याचे इशारे व सुखाच्या सूचना ही देत असतात .
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक ठिकाणी अंकाचा वापर होत असतो. प्रत्येक मिनिटा मिनिटाला तुम्हाला अंकाची गरज पडत असते. 1 ते 9 या अंकातच सारे विश्व सामावलेले आहे. जगातील सगळ्या मोठ मोठ्या शक्ती 1 ते 9 अंकात आहेत. कसे ते पाहूया नवग्रह, नव दुर्गा , नवनाथ, नवरंग, नवनाग, नऊ रत्न अशा बऱ्याचशा गोष्टी 1 ते 9 अंकात येतात.
‘अपना टाइम’ आलाच! घड्याळात अनेकदा 11:11 वाजलेले दिसतात का? नशीब बदलण्याची हीच ती वेळजन्म ,शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक्तिक समस्या/अडचणी, सुख ,समाधान, आर्थिक अडचणी, व्यवसायातील अडचणी, अडथळे, यश, अपयश, आरोप, आरोग्य, घराचा नंबर, गाडीचा नंबर, विजय, पराजय, संकट, मृत्यूच्या तारखेपासून, मृत्यूच्या वेळे पर्यंत सर्व काही अंकांचाच तर वापर होत असतो. तारीख, वेळ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात त्या सुध्दा अंकांच्या आधारे. वरील सर्व गोष्टीत आपल्यावर अंकाचा प्रभाव असतो.परंतु सर्व सामान्यपणे या गोष्टींचा इतर लोक विचार करत नाही.
एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व त्या व्यक्तीची क्षमता, स्वभाव व गुणदोष वगैरे कळतात.
जन्मतारीख ही नुसती संख्या नसून त्या अंकाचे आपल्या आयुष्यात विशिष्ट महत्त्व असते . ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून तर जन्मांक, भाग्यांक, आकर्षण अंक, धनप्राप्ती अंक, नावाचाही एक अंक असतो, त्याला नामांक म्हणतात. यासर्व गोष्टी लोकांना फायदेशीर ठरतात. पण या गोष्टी पाहण्यासाठी सखोल अभ्यास असावा लागतो .
वारंवार एकाच व्यक्तीशी बोलावंस वाटतंय.. हा असू शकतो संकेतप्रत्येक अंकाला स्वतःचे रंग, गुणधर्म असतात. तसेच तरंग शक्तीही असते. आपल्याला हवे असलेले ईश्वरी कृपेचे दान आपल्या बाजूने पडायचे असेल तर आपल्या नावाचाही आणि जन्मतारखेचाही सखोल विचार करावा लागतो. अंक अक्षरांमध्ये ईश्वरी अधिष्ठान असते म्हणून हे दैवी शास्त्र आहे. याचा नक्कीच सर्वांनी लाभ घ्यावा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)