जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Numerology: अंक 1 चे अंक 2 व 3 सोबतचे परस्पर संबंध कसे असतात?

Numerology: अंक 1 चे अंक 2 व 3 सोबतचे परस्पर संबंध कसे असतात?

Numerology: अंक 1 चे अंक 2 व 3 सोबतचे परस्पर संबंध कसे असतात?

स्वामी ग्रह: क्रमांक एक हा सूर्याचं प्रतिनिधित्व करतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 13 फेब्रुवारी : स्वामी ग्रह: क्रमांक एक हा सूर्याचं प्रतिनिधित्व करतो. क्रमांक 1 हा क्रमांक 2शी किती सुसंगत आहे. क्रमांक 2: क्रमांक एक आणि दोन मधील परस्पर संबंध खूप पूरक आहेत. कारण, ते दोन्ही दोन भिन्न किंवा विरुद्ध कोपऱ्यांवर उभे आहेत. एक क्रमांकाला सूर्याची अतिशय मजबूत शक्ती मिळते. हा क्रमांक स्वतंत्र, आक्रमक, कठोर, अहंकारी आणि आत्मविश्वासपूर्ण गुणांनी भरलेला आहे. तर, दोन या क्रमांकावर चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळे तो कोमलता, शुद्धता, लवचिकता, स्वाभिमान आणि निरागसपणा दर्शवतो. त्यामुळे जिथे जिथे क्रमांक एकला उणिवांचा सामना करावा लागतो तिथे त्याला क्रमांक दोनचा आधार मिळतो. क्रमांक दोनमधील कमकुवतपणा क्रमांक एकच्या ताकदीत रूपांतरित होतो आणि क्रमांक दोनची जी काही क्षमता आहे ती क्रमांक एकमध्ये सहज विलीन करता येते. म्हणून दोन्ही संख्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आघाडीवर चांगल्या नातेसंबंधांचा आनंद घेतात, असं म्हणता येईल. या संख्या एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत आहेत, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. श्री महालक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी आजच घरात आणा ही छोटी वस्तू .. क्रमांक 1 हा क्रमांक 3 शी किती सुसंगत आहे क्रमांक 3: क्रमांक तीन हा गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. गुरुला सर्व ग्रहांचा उपदेशक मानलं जातं. तो इतर सर्व ग्रह किंवा संख्यांच्या ज्ञानासाठी एक शासक म्हणून काम करतो. सूर्याचं प्रतिनिधित्व करणारा क्रमांक एक हा बुद्धिमत्ता, ज्ञान, संवाद, शहाणपण, प्रतिभा आणि कार्यक्षमतेसाठी क्रमांक तीनवर अवलंबून असतो. क्रमांक तीनच्या आशीर्वादाशिवाय, क्रमांक एकसाठी यशस्वी होणं आणि प्रगती करणं कठीण आहे. विशेषतः विद्यार्थी आणि व्यावसायिकांना तीनची मदत लागतेच. क्रमांक तीन हा एकचा गुरू आहे, असं म्हटलं जातं. जो त्याला (क्रमांक एक) ज्ञान आणि प्रतिभा कशी अंमलात आणायची आणि तिचा वापर कसा करायचा हे शिकवतो. या दोन्ही क्रमांकांचे एकमेकांशी भरपूर चांगले संबंध असतात आणि एकत्रितपणे ते एखाद्या व्यक्तीच्या करिअरमध्ये जादुई कामगिरी करू शकतात. हे दोन्ही क्रमांक आश्वासक आणि मैत्रीपूर्ण आहेत. त्यामुळे जन्मांक एकसह जन्मलेल्या व्यक्ती तीन बेरीज होणाऱ्या नावाची निवड करू शकतात. महिन्यातील 2, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या शिक्षण आणि राजकारणातील व्यक्ती त्यांचा मोबाईल क्रमांक निवडताना तीन अंकाचा समावेश असलेला नंबर निवडू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात