जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / करिअरची दिशा ठरवण्यासाठी जन्मतारीखही असते महत्त्वाची, अशी करा योग्य व्यवसायाची निवड

करिअरची दिशा ठरवण्यासाठी जन्मतारीखही असते महत्त्वाची, अशी करा योग्य व्यवसायाची निवड

करिअरची दिशा ठरवण्यासाठी जन्मतारीखही असते महत्त्वाची, अशी करा योग्य व्यवसायाची निवड

एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 जुलै: अनेकदा तुम्ही ज्योतिषींना हातावरील रेषा पाहून भविष्य सांगताना पाहिले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरूनही त्याच्या करिअर आणि नोकरीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. वास्तविक, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवते आणि यावरून त्याच्या कार्यक्षमतेसाठी आणि करिअरसाठी चांगले पर्याय दिसू शकतात. Guru Purnima: कधी आहे गुरुपौर्णिमा, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

 जर जन्मतारीख 01, 10, 19 किंवा 28 असेल तर व्यक्तीचा संबंध सूर्य आणि मंगळाशी असतो. प्रशासन, वैद्यक, तंत्रज्ञान हे क्षेत्र त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. लाकूड आणि औषधाचा व्यवसायही त्यांना अनुकूल आहे. नोकरीत समस्या असल्यास त्यांनी तांबे धारण करावे. रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे.

जर जन्मतारीख 02, 11, 20 किंवा 29 असेल तर असे लोक चंद्र आणि शुक्र या दोन्हीशी संबंधित असतात. अशा लोकांसाठी कला, अभिनय, संगीत, सौंदर्य आणि पाणी हे क्षेत्र उत्तम आहे. त्यांना पाणी, हॉस्पिटल, रेस्टॉरंट आणि सौंदर्याचा व्यवसायही आवडतो. नोकरीत समस्या असल्यास त्यांनी चांदीची अंगठी घालावी. महादेवाची मनोभावे पूजा करावी. छाया ग्रह केतुची वक्री गती, या 3 राशीच्या लोकांना बनवू शकते श्रीमंत!

 जेव्हा जन्मतारीख 03, 12, 21 किंवा 30 असेल तेव्हा व्यक्तीचा संबंध बुध आणि गुरूशी असतो. त्यांच्यासाठी शिक्षण, सल्लागार, वकिली आणि बौद्धिक क्षेत्र सर्वोत्तम मानले जाते. त्यांना स्टेशनरी, शिक्षण आणि धार्मिक कार्यातही भरपूर लाभ मिळतो. नोकरीत अडचण असल्यास त्यांनी सोन्याची अंगठी घालावी. यासोबत विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करावा.

बाथरूममध्ये वापरून पाहा मिठाशी संबंधित या वास्तु टिप्स, गरिबी होईल दूर

 जेव्हा जन्मतारीख 04, 13, 22 किंवा 31 असेल तेव्हा व्यक्तीचा संबंध राहू आणि चंद्राशी असतो. तंत्रज्ञान, वैद्यक, ज्योतिष, तंत्र-मंत्र इत्यादी क्षेत्रे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्याला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्सल्टन्सीची फील्डदेखील आवडते. नोकरीत अडचण असल्यास त्यांनी स्टीलची अंगठी घालावी. त्यांनी प्रत्येक स्थितीत नित्य भगवान शिवाची पूजा करावी.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात