मराठी बातम्या /बातम्या /religion /गुढीपाडवा 2023 : यंदाचे हिंदू वर्ष 12 नव्हे 13 महिन्यांचे! संवत्सरात श्रावण महिना अधिक

गुढीपाडवा 2023 : यंदाचे हिंदू वर्ष 12 नव्हे 13 महिन्यांचे! संवत्सरात श्रावण महिना अधिक

हिंदू नववर्ष 13 महिन्यांचे

हिंदू नववर्ष 13 महिन्यांचे

बुधवारी 22 मार्च रोजी श्रीशालिवाहन शके 1945 शोभन नाम संवत्सराचा प्रारंभ होत असून त्यात श्रावण महिना अधिक असल्याने यंदाचे वर्ष 13 मराठी महिन्यांचे असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : हिंदू नूतन वर्षात ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने यंदाचे वर्ष 13 महिन्यांचे आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी मराठी माध्यमांना दिली. हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र मासाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र शुक्‍ल प्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, त्यानुसार रविवारी शालिवाहन शके 1940 विलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. गुढीपाडव्याने आज हिंदू नववर्षाचा प्रारंभ झाला.

बुधवारी 22 मार्च रोजी श्रीशालिवाहन शके 1945 शोभन नाम संवत्सराचा प्रारंभ होत असून त्यात श्रावण महिना अधिक असल्याने यंदाचे वर्ष 13 मराठी महिन्यांचे असणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होत आहे. यापूर्वी 2004 मध्ये असा योग आला होता, अशीही माहिती सोमण यांनी दिली.

हे संवत्सर 22 मार्च 2023 पासून 8 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे यामध्ये 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 श्रावण अधिक मास आलेला आहे त्यामुळे नागपंचमी श्रीकृष्ण जयंती गणेश चतुर्थी नवरात्र विजयादशमी दीपावली इत्यादी सण 19 दिवस उशिरा येणार आहेत.

भारतातील सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत, यासाठी भारतीय पंचांग हे चंद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. यासाठी विशेष नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असता ज्या चंद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चंद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात, अशा पद्धतीने गणना होते.

कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. यावर्षी कर्क राशीत सूर्य असताना 18 जुलै रोजी आणि 17 ऑगस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावण मास आले आहेत, त्यामुळे हे वर्ष तेरा महिन्यांचे असणार आहे, अशी माहिती पंचांगतज्ज्ञ सोमण यांनी दिली.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Gudi Padwa 2023, Religion