मुंबई, 12 ऑक्टोबर : आर्थिक संकट ही जीवनातील सर्वात मोठी समस्या आहे. अनेकांच्याबाबतीत कष्ट करूनही घरात आर्थिक संकटे येतात किंवा पैसा येतो पण हातात राहत नाही, लगेच निघून जातो. या पाठीमागे काही दोष कारणीभूत असतात. देवी लक्ष्मी ही धन-समृद्धी आणि ऐश्वर्य यांची देवता मानली जाते, ज्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते, तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही. पण देवी लक्ष्मी नाराज असेल तर घरात गरिबी येते. प्रत्येक व्यक्तीला देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असावी असं वाटत असतं.
पण कधी-कधी जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते. यापैकी एक म्हणजे पैसा मोजताना आपल्याकडून होणाऱ्या चुका. पैसे मोजताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि काय काळजी घ्यावी, याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांनी माहिती दिली आहे.
पैसे मोजताना होणाऱ्या या चुका भारी पडू शकतात -
थुका लावून नोटा मोजण्याची सवय -
अनेकांना नोटा मोजताना बोटावर थुका लावण्याची सवय असते. नोटा मोजताना काही लोक अंगठ्यावर थुका लावतात. यानंतर घाईघाईने पैसे मोजतात. जरी यामुळे नोट्स मोजणे सोपे होते आणि आपला वेळ वाचतो. पण ही सवय घाणेरडी आणि चुकीची आहे आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
नोटांना थुका लावणे आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही चुकीचे आहे. तसेच हा लक्ष्मी आणि पैशाचा अपमान मानला जातो. त्यामुळे अशी सवय आजच सोडा. बोट नकळत ओलेच करायचे असेल तर तुम्ही बोटाला पाणी लावू शकता.
पैसे फेकणे -
काही लोक नाणी खेळण्यासारखी फेकतात, म्हणजे हातात देण्याऐवजी लांबून फेकतात. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. नोटा आणि नाणी फेकून देऊ नयेत. अशा प्रकारे पैसा फेकणे समोरच्या व्यक्तीचा आणि देवी लक्ष्मीचाही अपमान केला जातो. अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.
पैसे कुठेही ठेवण्याची सवय -
काही लोक बाहेरून घरी आल्यावर इकडे-तिकडे कुठेही पैसे ठेवतात. हा पैशांचा अपमान आहे. या सवयीमुळे तुम्हाला नेहमी आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे पैसा नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने ठेवावा. पैसे नेहमी स्वच्छ पाकिटामध्ये किंवा तिजोरीत ठेवा.
हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money matters, Religion