Kal Sarp Yog : कालसर्प योग म्हणजे काय? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय 

Kal Sarp Yog : कालसर्प योग म्हणजे काय? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय 

कालसर्प योग (Kalsarp Yog) विषयी अनेक तर्क वितर्क लावले जातात. कालसर्प योग मुळे आपल्या जन्मकुंडलीत काय बदल होतात वाचा.

  • Share this:

नाशिक 3 ऑगस्ट ;  कालसर्प योग (Kalsarp Yog) विषयी अनेक तर्क वितर्क लावले जातात. काल सर्प योगामुळे, एकतर व्यक्ती त्याच्या आयुष्यात मोठी उंची गाठतो आणि त्याला सर्व सुख, कीर्ती, आदर इत्यादी मिळतात अन्यथा हा योग त्याला खालच्या पातळीवर नेतो. यामुळे काही जण हे ऐकून घाबरतात. मात्र कालसर्प योग म्हणजे नक्की काय असत ? आपल्या जन्मकुंडलीत काय बदल होतात. कालसर्प योगाचे फायदे तोटे काय आहेत ? याविषयी या स्पेशल रिपोर्ट (Special Report) मधून सविस्तर माहिती जाणून घेऊया...

कालसर्प म्हणजे नक्की काय ?

कालसर्प म्हणजे आपल्या जन्मकुंडलीत,राशी कुंडलीत जेव्हा राहू व केतू हे दोन ग्रह समोरासमोर येतात. इतर सर्व ग्रह ह्या दोघांच्या मध्ये येतात तेव्हा अनिष्टकुल ग्रहांच प्रतिकूल तयार होते ते दूर व्हावं आणि त्या ग्रहांची अनुकलता प्राप्त व्हावी. म्हणून कालसर्प योग पूजा केली जात आसल्याचं शास्त्र अभ्यासक पुरुषोत्तम लोहगावकर (Purushottam Lohgavkar) यांचं मत आहे.

कालसर्प योगाचे हे आहेत 12 प्रकार

1) अनंत कालसर्प योग

2) कुलिक कालसर्प योग

3) वासूकी कालसर्प योग

4) शंखपाल कालसर्प योग

5) पद्म कालसर्प योग

6) महापद्म कालसर्प योग

7) तक्षक कालसर्प योग

8) कर्कोटक कालसर्प योग

9) शंखचुड कालसर्प योग

10) घातक कालसर्प योग

11) विषधर विषाक्त कालसर्प योग

12) शेषनाग कालसर्प योग

हेही वाचा-  Osmanabad : 6 व्या शतकातील धाराशीव लेणीचे सौंदर्य खुलले, ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

कालसर्प योगाचे परिणाम

आपल्या जन्मकुंडलीत कालसर्प योग तयार झाल्यानंतर आपल्याला अनेक संकटाना सामोरे जावं लागतं, असं शास्त्र अभ्यासक प्रशांत गायधनी (Prashant Gaydhani) सांगतात. आपल्यावर विविध मार्गांनी संकट येतात. आपली कामे वेळेवर पूर्ण होत नाही. आपली सतत चिडचिड होते नोकरीत मन लागत नाही आणि त्यामुळे आपल्यावर आलेली संकट दूर करण्यासाठी कालसर्प योग शांती करावी लागते. सर्व ग्रहांची पूजा केल्यानंतरच आपण या संकटातून दूर होऊ शकतो,' असा दावा गायधनी यांनी केला आहे.

कालसर्प योग पुजा कधी आणि कुठे केली जाते ?

कालसर्प योग पुजा त्र्यंबकेश्वरमध्ये (Trambakeshwar) विधिवत केली जाते. येथे या पूजेला विशेष महत्व आहे. पुजा करण्याचे विविध मुहूर्त असतात. महिन्यातून मोजके आठ ते दहा मुहूर्त असतात. त्या मुहूर्तावर पुजा केली जाते. त्यामुळे जर आपल्याला कालसर्प पुजा करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधून माहिती घेऊ शकता. प्रशांत गायधनी (शास्त्र अभ्यासक,पंडित) मो नं : 918805171100, पुरुषोत्तम लोहगावकर (शास्त्र अभ्यासक,पंडित) मो नं : 919822068705, मनोज थेट (शास्त्र अभ्यासक,पंडित) मो नं :98225 26396, वैभव जोशी (शास्त्र अभ्यासक,पंडित) मो नं :09881049841

गुगल मॅप वरून साभार...

पुजा करण्यासाठी दक्षणा आणि वेळ किती लागतो ?

कालसर्प योग पुजा करण्यासाठी 2100 रुपये लागतात. त्यामध्ये पूजेचे सर्व साहित्य पंडीतांकडून दिले जाते. त्यापुढे ही आपण आपल्या शक्ती नुसार पंडितांना दान देऊ शकतो. या विधिवत पुजेसाठी 2 तास 30 मिनिटे वेळ लागतो.

हेही वाचा- Osmanabad : लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची 'बोलकी' चित्रं

कालसर्प योग शांती पूजेची पद्धत

प्रथमतः जे पूजेला बसणार आहेत त्यांना कुशावर्त तीर्थावर स्नान करावे लागते. गणपती पूजनाने विधीची सुरुवात होत असते. नंतर पुण्यवाचन, मातृकापूजन व नंदी श्राद्ध गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केले जाते नंतर मुख्य देवता पूजन म्हणजेच राहू, केतू, चांदीचे नवनाग पूजन होते. नवग्रह पूजन, रुद्र कलश पूजन संपन्न होते. यानंतर गुरुजी स्थापित देवतांचे हवन करतात. मात्र ते करणे बंधनकारक नाही. बलिप्रदान करून गुरुजींमार्फत पूर्णाहुती दिली जाते.

कालसर्प योग पुजेविषयी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे मत काय ?

तुमच्या पत्रिकेत काल सर्प दोष आहे राहू,केतू आहेत. त्यामुळे तुम्हाला काल सर्प योग पूजा करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला शांती मिळेल तुमची काम होतील. हे सर्व अवैज्ञानिक आहे. सामान्य नागरिकांना फक्त घाबरवण्याचे काम केल जातय. माणसाच्या आयुष्यात संकट ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने येत असतात. त्यावर आपण आपल्या मेहनतीने कष्टाने मात करायची असते. म्हणून काय काल सर्प योग पूजा केली म्हणजे संकट लगेच दूर होतील असं नसतं. साप कुठे असतो ग्रह कुठे असतात याचा काहीही परस्पर सबंध नसतो. मुळात हे अवैज्ञानिक आहे. यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असं मतं अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक नितीन शिंदे (Nitin Shinde) यांनी मांडलं आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published: August 3, 2022, 3:03 PM IST

ताज्या बातम्या