जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / यंदा श्रावण आहे खास! असा करा साजरा, मग समृद्धी आलीच म्हणून समजा

यंदा श्रावण आहे खास! असा करा साजरा, मग समृद्धी आलीच म्हणून समजा

अधिक श्रावण महिना आणि मूळ श्रावण महिना असे एकूण 8 श्रावणी सोमवार असतील.

अधिक श्रावण महिना आणि मूळ श्रावण महिना असे एकूण 8 श्रावणी सोमवार असतील.

श्रावण महिना महादेवांना समर्पित मानला जातो, त्यामुळे या काळात शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. म्हणूनच श्रावणी सोमवारी शिव मंदिरात भक्त मोठ्या संख्येने येतात.

  • -MIN READ Local18 Alwar,Rajasthan
  • Last Updated :

पियुष पाठक, प्रतिनिधी अलवर, 26 जून : यंदाचा श्रावण खूप खास असणार आहे. कारण दरवर्षी 4 ते 5 श्रावणी सोमवार असणारा हा महिना यावर्षी संपूर्ण 59 दिवसांचा असेल. असा योग 19 वर्षांनी जुळून आल्याचं सांगितलं जातं. येत्या 18 जुलैपासून अधिक मासाला सुरुवात होईल आणि बुधवार, 16 ऑगस्ट रोजी तो संपेल. अधिक मास संपताच 17 ऑगस्टला श्रावणास सुरुवात होईल. अशाप्रकारे अधिक श्रावण महिना आणि मूळ श्रावण महिना असे एकूण 8 श्रावणी सोमवार असतील.

News18लोकमत
News18लोकमत

‘श्रावण महिना महादेवांना समर्पित मानला जातो, त्यामुळे या काळात शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. म्हणूनच श्रावणी सोमवारी शिव मंदिरात भक्त मोठ्या संख्येने येतात. त्याचबरोबर अधिक मासात एखादं दान करणं पुण्याचं मानलं जातं. हरिद्वार, गंगेच्या पाण्यात स्नान करण्यालाही मोठं महत्त्व असतं. भुकेलेल्या जीवाला खायला देणं, इतरांना मदत करणं, सोमवारी उपवास पकडणं लाभदायक ठरतं. शिवाय श्रावणात मंगळा गौर साजरी केल्याने देव प्रसन्न होतात असंही मानलं जातं’, असं पंडित शशिकांत यांनी सांगितलं आहे. ‘या महिन्यात केलेले दान, हवन, पूजा थेट देवाच्या चरणात पोहोचतात, म्हणूनच भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, असं पंडित म्हणाले. त्याचबरोबर स्वच्छ मनाने देवाचं स्मरण केल्यास भक्तांना नक्कीच लाभ होतो’, असंही त्यांनी नमूद केलं. Monsoon Update : हवामान विभागाकडून उद्या महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, या भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दरम्यान, अधिक मास येण्याची पद्धत पूर्णतः खगोलशास्त्रीय आहे. पृथ्वीचा सूर्याभोवती एक फेरा 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंदांचा असतो. मात्र मोजायला सोयीचं व्हावं म्हणून आपण 365 दिवसांनी नव्या वर्षाची सुरुवात करतो. तर दर चार वर्षांनी येणाऱ्या एका वाढीव दिवसाच्या वर्षाला म्हणजेच 366 दिवसांच्या वर्षाला आपण ‘लीप वर्ष’ म्हणतो. हे झालं सूर्याचं. तर, पृथ्वीभोवती चंद्राचा एक फेरा म्हणजे ‘चांद्रमास’. एका वर्षात असे 12 चांद्रमास पूर्ण होतात, यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावास्या असा 29.5 दिवसांचा काळ असतो. त्यामुळे चांद्रवर्ष 354 दिवसांचं असतं. म्हणजेच सौरवर्षापेक्षा चांद्रवर्ष हे 11 दिवसांनी लहान असतं. हाच फरक दरवर्षी वाढत राहू नये, यासाठी चांद्रवर्षात ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच ‘अधिक’ घेतला जातो आणि दोन्ही दिनदर्शिका एकेमकांना जोडल्या जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात