मुंबई, 20 जुलै: आज 20 जुलैपासून मोहरम महिन्याची सुरुवात होत आहे. मोहरम हा सण मुस्लिमांसाठी दु:खाचा सण मानला जातो. मोहरम महिन्याच्या 10 तारखेला प्रेषित हजरत इमाम आणि हजरत हुसेन यांना हौतात्म्य आले. त्यामुळे मुस्लिम समाज हा संपूर्ण महिना दु:खवटा म्हणून पाळतात. या महिन्यात मातम पाळतात - 10 तारखेला शिया मुस्लीम मोहरमला शोक करतात. तजिए तयार केले जातात, नंतर ते कब्रिस्तानकडे (स्मशानभूमी) सुपूर्द केले जातात. मुस्लिम महिला आणि पुरुष काळा पोशाख परिधान करतात. एखाद्या कुटुंबात मृत्यू झाला की, त्या कुटुंबात जे वातावरण असते, तेच वातावरण मुस्लिम समाजातील लोक मोहरमच्या 10 दिवशी आपल्या घरात पाळतात. चुली पेटवल्या जात नाहीत, झाडू मारला जात नाही. अन्न बनवलं जात नाही. दुसऱ्या घरातून मिळालेलं अन्न हे लोक खातात.
म्हणून मोहरम पाळतात - असे म्हटले जाते की, सुमारे 1400 वर्षांपूर्वी कर्बला युद्ध झाले होते. हे युद्ध हजरत इमाम आणि हजरत हुसेन (दोघेही भाऊ) यांनी सम्राट यजीदच्या सैन्यासोबत लढले होते. सम्राट यजीदला इस्लाम धर्म नष्ट करायचा होता. हे युद्ध इस्लाम धर्म वाचवण्यासाठी लढले गेले आणि या युद्धाच्या शेवटी हजरत इमाम आणि हजरत हुसेन यांचा मृत्यू झाला. या जन्मतारखांची जोडी प्युअर आणि निष्ठावान पार्टनर ठरते, आनंदी जीवन जगतात ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला तो दिवस मोहरम महिन्याची 10 तारीख असल्याचे म्हटले जाते, म्हणून प्रत्येक वर्षी मोहरमच्या 10 तारखेला शोक केला जातो. तसे, मुस्लीम या मोहरमचा संपूर्ण महिना स्वतःसाठी दुःखाचा महिना मानतात. या महिन्यात घरात नवीन कपडे घेतले जात नाहीत, नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही, टीव्ही लावला जात नाही, फक्त नमाज आणि कुराण पठण केले जाते. 10 तारखेला इमाम आणि हुसैन यांच्या हौतात्म्याच्या दिवशी सर्व शिया आणि सुन्नी मुस्लिम एकत्र ताजिए काढतात. त्यानंतर स्मशानात अस्थिकलशाच्या स्वाधीन (सुपुर्द ए खाक) केलं जातं. घरात पितृदोष असेल तर असे संकेत वारंवार दिसतात; सोमवती अमावस्येला करा हे उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)