#क्रमांक 2: क्रमांक 2 हा क्रमांक 6 शी परिचित आहे तर क्रमांक 6 सह हा तटस्थ संबंधाच्या नमुन्याचं अनुसरण करतो. क्रमांक सहाला आपल्या पॅनेलमध्ये दोनला ठेवणं कठीण वाटतं.
या दोन्ही जन्मांकाच्या व्यक्ती जगण्यासाठी भिन्न तत्त्वज्ञानासह समान पद्धतीचे अनुसरण करतात, त्यामुळे अशी स्थिती निर्माण होते. या व्यक्ती सहसा अशा वादात पडतात जे सहजपणे शांत केले जाऊ शकतात.
या व्यक्ती कमिटेड आणि भावनिक असतात. त्या विवाह किंवा प्रेम संबंधांत प्युअर आणि निष्ठावान पार्टनर ठरतात.
सहा किंवा दोन जन्मांक असलेले तरुण किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना यशाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळते.
सहा आणि दोनचा प्रभाव असलेली महिला नशिबवान असते तसंच ती आपल्या कुटुंबाला आधार देणारी सून ठरते. या व्यक्तींना इतरांच्या पाठिंब्याची गरज असते. त्या स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. त्यांना एकटेपणाची भीती असते. त्यामुळे त्यांनी गटात राहिलं पाहिजे.
या जन्मांकांच्या व्यक्ती सर्जनशीलतेशी संबंधित करिअर, लिक्विड, सरकारी ऑर्डर्स, डिझायनिंग, दागिने, हिरे, ब्युटी प्रॉडक्ट्स, सजावट, टूर आणि ट्रॅव्हल्स, आयात-निर्यात आणि धान्य विक्री या क्षेत्रांत यशस्वी ठरतात.