परमजीत कुमार, प्रतिनिधी देवघर, 23 जून : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-तारे आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा सर्व राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो. आता येत्या 24 जून रोजी बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 24 तारखेपासून 9 जुलैपर्यंत सूर्यासह बुध मिथुन राशीतच राहील. त्यामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. बैद्यनाथ धामचे ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुदगल यांनी मिथुन राशीसाठी हा ग्रहप्रवेश अत्यंत फलदायी ठरणार, असं सांगितलं आहे. त्यासोबतच कन्या, वृषभ, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांनाही आर्थिक लाभ होणार आहे. तर काही राशींवर या प्रवेशाचा अशुभ प्रभाव दिसून येईल. आज आपण पाहूया कोणकोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल.
वृषभ : या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. करिअरसंबंधी सर्व अडथळे दूर होतील. पगारात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच हा ग्रहप्रवेश आपल्यासाठी अनुकूल ठरेल. Vastu Tips : घराच्या ईशान्य दिशेला चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू अन्यथा होईल नुकसान, वास्तू तज्ज्ञांचं मत मिथुन : या राशीतच बुधादित्य योग निर्माण होणार असल्याने या राशीच्या व्यक्तींना या काळात मोठा आर्थिक लाभ होईल. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अतिशय लाभदायी ठरेल. कामकाजात बढती मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातारण आनंदी राहील. शिवाय आपल्या कामकाजाचा व्यापही विस्तारेल. कन्या : या राशीच्या व्यक्तींना या काळात त्यांचे थकलेले पैसे परत मिळतील. शिवाय आपल्या बौद्धिक क्षमतेचा योग्यरीत्या वापर करू शकाल. कार्यक्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होतील. जोडीदार आणि आई-वडिलांबरोबर वेळ घालवाल. सिंह : या राशीच्या व्यक्तींना या काळात धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असून त्यातून चांगला फायदा मिळेल. तूळ : या राशीच्या व्यक्तींसाठी सुरू असलेली वाईट वेळ आता संपेल. आपल्याला समाजात मान-सन्मान मिळेल. घरात मंगल कार्य होण्याचीही शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. घरातील वातावरणही उत्साहवर्धक असेल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)