नाशिक 14 जानेवारी : तीळगूळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत मकर संक्रातीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी असलेल्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून 5 गोष्टी करणे टाळावे. अन्यथा, त्याचे परिणाम वर्षभर भोगावे लागतील असा सल्ला नाशिकचे ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली आहे. कठोर बोलणे टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही कठोर बोलणं टाळावं, वाईट कोणाला बोलू नये, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतात. कोणाशी वाद-विवाद करू नये. वाद होतील, समोरचा नाराज होईल त्याचं मन दुखावेल अशा गोष्टी करू नये. कठोर बोलू नये याचा अर्थ आपले हितसंबंध व्यवस्थित वाढावे, सगळ्यांशी चांगल्या प्रकारे संबंध वृद्धिंगत व्हावे हा आहे. गवत कापू नका,झाडे तोडू नका या दिवशी कृषी विषयक कर्म करू नये. गवत कापू नये, झाडे तोडू नये,या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात. यापूर्वी झाडं तोडून त्याचा सरपणासाठी वापर केला जात असे. आता हे काम बंद झाले आहे. मकर संक्रांत हा आनंदाने गोड मानण्याचा दिवस आहे. एकमेकांनी भेटावं बोलावं गोड बोलावं प्रेमाने आपलस करावं असं असणारा दिवस असल्यामुळे त्या दिवशी शेतकरी बांधवांनी सुद्धा सुट्टी घ्यावी. नातेवाईक, मित्र परिवार यांच्याशी संवाद साधावा. Makar Sankrant 2023 : कशी बनवतात भोगीची पारंपरिक भाजी? पाहा Video वाद टाळावा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये जात असतो. हे सूर्याचे संक्रमण होते. ते संपूर्ण जगावर शूभ परिणाम करणारं आहे. त्या दिवशी एकमेकांशी संघर्ष, घर्षण टाळावे. कोणत्याही प्रकारता वाद होईल अशी कृती करू नका.
कामाचा अतिरेक नको मकर संक्रातीच्या दिवशी सर्वांना प्रेमानं भेटावं. त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात. आपल्या कामात गुंतून राहू नये. तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्याबाबत इतरांशी चर्चा करुन त्यावर मार्ग काढावा. प्रत्येकाशी मिळून मिसळून राहण्याचा हा दिवस आहे. Makar Sankranti 2023 Ukhane : पहिल्या संक्रांतीची तयारी खास, सुंदर मराठी उखाणे स्मार्ट सूनेसाठी गाई म्हशीची दुधाची धार काढू नये हा महत्वाचा मुद्दा आहे. या दिवशी गाई म्हशीची दुधाची धार काढणं टाळावं, कारण दुधाला खूप किंमत आहे. वर्षभर आपण दुधाचे अनेक पदार्थ खातो,दररोज चहा,कॉफी घेतो. हे सर्व दुधापासून बनलेलं असत. मकर संक्रातीच्या दिवशी संक्रमण होत असतं. त्याचा पंचमहाभूतांवर परिणाम होता. त्याचा आदर म्हणून या गोष्टींना संक्रातीच्या दिवशी आराम द्यावा,’ असा सल्ला डॉ. धारणे यांनी दिला आहे.