पुणे, 14 जानेवारी : तीळगूळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत एकमेकांवरील स्नेहाची वृद्धी करणारा सण म्हणजे मकर संक्रात. यावर्षी 14 ऐवजी 15 जानेवारीला मकर संक्रात आहे. ही संक्रात कशी साजरी करावी. तसंच एरवी अशुभ समजले जाणारे काळ्या रंगाचे कपडे संक्रातीच्या दिवशी का घातले जातात याबाबत पुण्यातील ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी खास माहिती दिली आहे. मकर संक्रातीचं महत्त्व सूर्याचे धनू राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होण्याच्या कालखंडाला मकर संक्रमण असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत येतो तो दिवस मकर संक्रात म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी संक्रांती देवीनं शंकासुराचा वध करुन पृथ्वीला वाचवलं, असंही म्हंटलं जातं. या निमित्तानं देखील मकर संक्रांत साजरी केली जाते. यावर्षी देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे चालली आहे आणि ती ईशान्येकडे पाहत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसले आहे. ती सर्प योनीत असून देवी ही कुमारिका आहे. यावर्षी संक्रातीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे घालू नये. त्या दिवशी काळ्या वस्त्रला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी 5 गोष्टी करू नका,अन्यथा वर्षभर भोगावे लागतील परिणाम! Video काळ्या रंगाला महत्त्व का? भारतीय संस्कृतीमध्ये काळा रंग हा सर्व सणांना वर्ज मानला जातो. मात्र संक्रांत हा असा एकमेव सण असेल आहे. या दिवशी काळे वस्त्र परिधान केले जाते. या दिवसांमध्ये थंडी अधिक असल्यामुळे सूर्याची उष्णता हव्या त्या प्रमाणात आपल्याला मिळत नाही. यामुळे काळा रंगाकडे आकर्षित होत असते. म्हणूनच मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करणारा विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काळया रंगाच्या साड्या स्त्रिया सुवासिनी नेसत असतात. लहान मुलांना पुरुषांना देखील या दिवशी काळे वस्त्र घालण्याची मुभा, असे गलांडे यांनी सांगितले.
हा दिवस सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन साजरा करतात. तर या दिवशी हलव्याचे दागिने घालून हा सण स्त्रिया आणि लहान मुलं साजरा करतात. या दिवशी स्त्रिया एकमेकांना हळदीकुंकू आणि वाण देतात. या वणामध्ये त्या त्या ऋतूनुसार येणाऱ्या पिकांचे वाण एकमेकांना दिले जाते. संक्रांतीला उपासनेला विशेष महत्त्व असते. ज्यांना आपल्या तंत्र मंत्राच्या साधना सिद्ध करून घ्यायच्या आहे त्यांनी संक्रांतीला पुण्य ठिकाणी पुण्य काळामध्ये प्रयत्न करावे, असा सल्ला ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी दिला.