महाशिवरात्री निमित्त देशभरातील सर्वच शिव मंदिरे आकर्षक पद्धतीनं सजली आहेत. नागपूर शहरातही काही पुरातन शिव मंदिर आहेत.
इतवारी बाजारात असलेले जागनाथ बुधवारी हे मंदिर हे अतिशय पुरातन असून नागपूरचे ग्राम दैवत म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात इतर अनेक मंदिरं आहेत.
मंदिराच्या संपूर्ण भिंतींवर कोरीव काम करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विष्णूची 10 रूपे, महाभारत, रामायण , असे पुराणातील शिल्प कोरले आहेत.
नागपुरातील महाल भागात असलेले प्रख्यात कल्याणेश्वर सर्व नागपूरकरांच्या श्रद्धास्थान आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कार्यकाळात या मंदिराला वैभव प्राप्त झाले आहे.
महाल भागातील नागपूरकर भोसले यांच्या वाड्याजवळच जमिनीत महादेवाचे मंदिर आहे. हे शिवलिंग जमिनीत असल्याने त्याला पाताळेश्वर असं म्हंटलं जातं.
नागपुरातील नंदनवन भागात पुरातन बावडीमध्ये वसलेले शिव मंदिर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शहरात मध्यवर्ती भागात प्राचीन विहिरीमध्ये हे मंदिर आहे. विशेष म्हणजे हे मंदिर वर्षातून एकदाच महाशिवरात्रीच्या दिवशी उघडे असते. त्यामुळे महाशिवरात्रीला इथं मोठ्या संख्येनं भाविक येतात.
नागपुरातील नंदनवन भागात असलेली ही ५१ फुटी मूर्ती नागपुरातीलचं नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच उभी शिवमूर्ती आहे.
नागपूर -अमरावती महामार्गावर सुराबर्डी इथं शंकर-पार्वती आणि गणपतीची भव्य मूर्ती असलेलं मंदिरही प्रेक्षणीय ठिकाण आहे.