जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Mahashivratra 2023 : गुरुचरित्रामध्येही उल्लेख असणारे तारकेश्वर मंदिर, पाहा काय आहे इतिहास, Video

Mahashivratra 2023 : गुरुचरित्रामध्येही उल्लेख असणारे तारकेश्वर मंदिर, पाहा काय आहे इतिहास, Video

Mahashivratra 2023 : गुरुचरित्रामध्येही उल्लेख असणारे तारकेश्वर मंदिर, पाहा काय आहे इतिहास, Video

Tarakeshwar Temple In kolhapur : या मंदिराचा उल्लेख पौराणिक ग्रंथात देखील आढळतो. मंदिराचा इतिहास काय आहे जाणून घ्या.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 18 फेब्रुवारी :  कोल्हापूर च्या पंचगंगा नदी तीरावर अनेक मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकीच एक आहे भगवान शंकराचे तारकेश्वर मंदिर. दिसायला अगदी छोटसं असे हे मंदिर जरी असलं तरी देखील या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या मंदिराचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथात देखील आढळतो. आकाशात तारकम् लिंगम् ।पाताले हाटकेश्वरम् ।मृत्यूलोके महांकालम् ।लिंगत्रय नमोस्तुते ॥ याप्रमाणेच शिवपुजनात तीन शिवलिंग पूजनाला महत्व आहे. एक म्हणजे पंचगंगा नदी घाटावरील श्री तारकेश्वर, दुसरे भोगावती नदीपात्रातील शिंगणापूर येथील श्री हाटकेश्वर, व तिसरे म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराजवळील श्री महाकालेश्वर होय. कोल्हापूरची जीवनदायीनी असणाऱ्या पंचगंगा नदी घाटावर करवीरच्या छत्रपती घराण्याच्या समाधी मंदिर परिसरातील संस्थान शिवसागर आहे. या शिवसागरच्या आग्नेय कोपऱ्यात हे तारकेश्वरचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक समाधी मंदिरांमुळे या तारकेश्वर मंदिरालाही एक विशेष महत्त्व प्राप्त आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    11 व्या शतकातील शिवमंदिर खरंतर करवीरचा रक्षणकर्ता अशीच तारकेश्वरची ओळख आहे. दगडी पाषाणातील सुमारे 11 व्या शतकातील भक्कम व प्राचीन असे हे शिवमंदिर आहे. या मंदिराला नक्षीदार खांब आहेत. तर वेलबुट्टी आणि पतंग, चक्राकार कमळे विविध कलाकृतींनी या मंदिराच्या दगडी भिंती साकारलेल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना छोटाशा चौकटीतून आत प्रवेश करावा लागतो. आतमध्ये अंधार जरी असला तरी एक छोटीशी खिडकी उजेडासाठी आहे. खालच्या बाजूला तारकेश्र्वराचे शिवलिंग आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात शिवलिंगाच्या वरील बाजूस छतावर दगडी पाषाणात षोडशदश कमलाप्रमाणे नक्षी अर्थात सोळा पाकळ्या असणारे कमळ कोरलेले आहे. शिवलिंगाला दुर्मिळ असे पांढरे स्फटिक या तारकेश्वर मंदिरात असणारे शिवलिंग देखील अत्यंत दुर्मिळ आहे. या शिवलिंगाचा शाळिग्राम हा पांढरा स्फटिक आहे. नर्मदा नदीच्या पात्रात सापडणारे हे पांढऱ्या स्फटिकाचे शिवलिंग बाणलिंग म्हणून ओळखले जाते. शिव पूजनात हे बाणलिंग अत्यंत दुर्मिळ आणि महत्वपूर्ण असते. संस्थानिक राजाश्रयकरवीर संस्थानचे पहिले छत्रपती संभाजी महाराज करवीरकर उर्फ शंभू छत्रपती यांची तारकेश्वरावर निस्सीम भक्ती आणि श्रद्धा होती. त्यामुळेच नित्य पूजा-अर्चा, नैवेद्य, नंदादीप यासह या मंदिराच्या इतर व्यवस्थेसाठी अनेक सनदा 17 व्या शतकात दिल्याच्या नोंदी आढळतात, असे या मंदिराचे पुजारी सौरभ मुजुमदार यांनी सांगितले आहे.

    Mahashivratra 2023 : महादेवाच्या पिंडीचे तोंड नेहमी उत्तरेला का असते? मंदिरातील काही नियम तुम्हाला माहितीच हवे! Video

    इ.स.13 व्या शतकातील अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये पंचगंगा नदी घाटाचे उल्लेख आढळतात. ज्यामध्ये तारकेश्वरच्या मंदिरा समोरील घाट हा ‘तारकेश्वर घाट’ म्हणूनही ओळखला जात असल्याचे समजते. करवीर महात्म्य, गुरुचरित्र अशा धार्मिक ग्रंथांसह अनेक ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तकांमध्ये या तारकेश्वर मंदिराचा उल्लेख आढळतो. हा उल्लेख गुरुचरित्रामध्ये बाणलिंग म्हणून पाहायला मिळतो. नदीकाठावरच असल्यामुळे हे मंदिर पुराच्या पाण्यात बऱ्याचदा बुडते. पण तरीदेखील या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आजही टिकून आहे. अशा प्रकारच्या या ऐतिहासिक मंदिराला एकदा नक्की भेट दिली पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात