जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / पंचगंगा - कृष्णेचा नृसिंहवाडीत जलाभिषेक, दक्षिणद्वार सोहळ्याला भक्तांची मांदियाळी

पंचगंगा - कृष्णेचा नृसिंहवाडीत जलाभिषेक, दक्षिणद्वार सोहळ्याला भक्तांची मांदियाळी

पंचगंगा - कृष्णेचा नृसिंहवाडीत जलाभिषेक, दक्षिणद्वार सोहळ्याला भक्तांची मांदियाळी

पंचगंगा - कृष्णेचा नृसिंहवाडीत जलाभिषेक, दक्षिणद्वार सोहळ्याला भक्तांची मांदियाळी

नृसिंहवाडी दत्त मंदिरात यंदाचा पाहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला. कृष्णा पंचगंगेच्या पाण्याने जलाभिषेक केला.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 23 जुलै: पावसामुळे सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र कोल्हापुरातील पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असताना दत्त भक्त एका गोष्टीची वाट पाहत असतात. ती म्हणजे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात होणाऱ्या दक्षिणद्वार सोहळ्याची. यंदाचा पाहिला दक्षिणद्वार सोहळा आज नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात संपन्न झाला. त्यामुळे परिसरातील भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी आणि तीर्थस्नानासाठी मांदियाळी दिसत होती. नृसिंहवाडी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असणारे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या काठावर हे मंदिर वसले आहे. येथील दत्त पादुकांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येत असतात. तर या ठिकाणी होणारा दक्षिणद्वार सोहळा हा येथील एक महत्त्वाचा सोहळा आहे. या सोहळ्यावेळी बरेच जण या पाण्यात स्नान करत असतात.

News18लोकमत
News18लोकमत

दुपारी 1 वाजता सोहळा संपन्न कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे मंदिरात आलेल्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे दत्त मंदिरात यंदाच्या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा दुपारी एक वाजता संपन्न झाला. मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या पादुकांना पाणी लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, श्रींची उत्सवमूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. काय असतो दक्षिणद्वार सोहळा? मंदिरा समोरुन वाहणारी कृष्णा नदी ही मंदिर परिसरा भोवतीच फक्त दक्षिणाभिमुख आहे. तर पुढे संगमानंतर ही नदी पुन्हा पूर्वाभिमुख झालेली आहे. या नदीचे पाणी उत्तर भागातून दत्त महाराजांच्या पादुकांवरून जेव्हा दक्षिण भागात येते. तेव्हा त्याला दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात. यावेळी या ठिकाणी तीर्थस्नान केल्यास अनेक तीर्थयात्रा पूर्ण केल्याचे पुण्य लाभते, असा एक संकेत असल्याचे मंदिरातील मुख्य पुजारी गिरीश खोंबारे-पुजारी यांनी सांगितले आहे. हरिश्चंद्रगड ट्रेकरचं पहिलं प्रेम, पाहा खास PHOTOS या शुभ मुहूर्तावर दत्त भक्तांनी केले स्नान सध्या अधिक श्रावण महिना सुरू असताना या काळात हा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. त्यामुळे भाविकांनी दिगंबरा दिगंबरा असा जयघोष करत, भक्तिमय वातावरणात या दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. या ठिकाणी स्नानाचा लाभ घेण्यासाठी अनेक भक्त येत असतात. सुरक्षा रक्षकांची वाढ यंदाचा पाहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरातील दत्त भक्तांनी गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे काही दुर्घटना घडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली आहे. वाढणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे दरम्यान, सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे अजून पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी देखील इशारा पातळी अर्थात 39 फुटांच्या जवळून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊनच या सोहळ्याचा लाभ घ्यावा असेही श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात