मुंबई, 02 डिसेंबर : ज्योतिषविज्ञान हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता विषय आहे. कोणालाही स्वतःबद्दल जाणून घ्यायला आवडतं. आपण स्वत: आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल चांगले जाणतो, पण तरीही आपल्याला आपले भविष्य, नोकरी, करिअर आणि वैवाहिक जीवन याविषयी सर्व काही जाणून घ्यायचे असते. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत ज्यातून भविष्यातील अनेक गोष्टींचा किमान अंदाज बांधला जाऊ शकतो. पण, प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळेसही एका वेगळ्या शैलीतून भोपाळचे ज्योतिषी-पंडित हितेंद्र कुमार शर्मा शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते हे सांगत आहेत.
वर्तन-वागणूक
जे लोक शुक्रवारी जन्मलेले असतात त्यांना नट्टा-पट्टा करून छान-छान दिसणं जास्त आवडतं. त्यांना त्यांची स्तुती ऐकायला खूप आवडते. याशिवाय त्यांना मनोरंजनाची खूप आवड आहे. शुक्रवारी जन्मलेले लोक खूप हुशार असतात. त्यांचा विनोद करण्याचा स्वभाव त्याला मित्रांमध्ये लोकप्रिय बनवतो.
शिक्षण -
शुक्रवारी जन्मलेले लोक शैक्षणिक क्षेत्रात सरासरी असतात. त्यांना कलात्मक गोष्टी आणि कलेची विशेष ओढ असते.
आजार -
शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तीला कोणत्याही बदलत्या हवामानात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण त्यांना सर्दी-खोकला खूप लवकर होतो. शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तीला वृद्धापकाळात सांधे आणि हाडे दुखण्याची समस्या पाहायला मिळते.
सकारात्मक बाजू -
शुक्रवारी जन्मलेल्यांचा आनंदी स्वभाव त्यांना लोकांच्या आकर्षणाचा केंद्र बनवतो. ते आपल्या लाइफ पार्टनरची खूप काळजी घेतात. शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना विरोधकांना आपल्या बाजूने कसे बनवायचे हे चांगले जमते.
हे वाचा - हे 8 गुण असलेली माणसं कधीच होत नाहीत दु:खी; काय सांगते विदुर नीति?
नकारात्मक बाजू -
शुक्रवारी जन्मलेले लोक थोडे गर्विष्ठ, अहंकारी असतात. त्यांच्यात संयम नसतो. त्यांना अवाजवी शो-ऑफ करायला आवडते. छंद पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक संकटातूनही जावं लागतं. त्यांच्याशी विनोद करताना काळजी घेण्याची गरज आहे. कशावर कधी नाराज व्हावं यांना कळत नाही.
हे वाचा - नकारात्मक उर्जेची होईल राख-रांगोळी; घरात कापरासोबत जाळून पहा ही एक वस्तू
नोकरी आणि व्यवसाय
शुक्रवारी जन्मलेले लोक संगीत, लेखन, चित्रकला, चित्रपट, फॅशन, सौंदर्य उद्योग इत्यादी क्षेत्रात यश मिळवतात.
प्रेम आणि वैवाहिक जीवन
शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तीवर शुक्राचा प्रभाव असतो, त्यामुळे त्याचे मन चंचल राहते आणि याच कारणामुळे त्यांची अनेक प्रेमप्रकरणे असतात. पण खरे प्रेम मिळाल्यावर हे लोक स्थिर होतात. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले आणि यशस्वी होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Personal life, Religion