मराठी बातम्या /बातम्या /religion /

नकारात्मक उर्जेची होईल राख-रांगोळी; घरात कापरासोबत जाळून पहा ही एक वस्तू

नकारात्मक उर्जेची होईल राख-रांगोळी; घरात कापरासोबत जाळून पहा ही एक वस्तू

नकारात्मक वातावरण बदलण्यासाठी उपाय

नकारात्मक वातावरण बदलण्यासाठी उपाय

तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर वास्तुशास्त्र तुमची मदत करू शकते. वास्तूनुसार घरामध्ये कापूर आणि...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 30 नोव्हेंबर : घरातील सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी लोक विविध उपाय, पूजा-विधी करत असतात. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये, यासाठी कित्येक गोष्टींची काळजी घेतली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखण्यासाठी लवंगाचे उपाय सांगण्यात आले आहेत. लवंग ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली गेली आहे.

देवी-देवतांच्या पूजेतही लवंग वापरतात. याशिवाय लवंगाचे अनेक उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याचा वापर करून कुंडलीत उपस्थित ग्रहांना शांत केलं जाऊ शकतं. तुम्हालाही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर लवंगाशी संबंधित उपाय करून पहा. याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती पाहुया.

1. सकारात्मकता वाढवण्यासाठी उपाय

तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर वास्तुशास्त्र तुमची मदत करू शकते. वास्तूनुसार घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पुजेच्या वेळी हवनकुंडात पंडितांना लवंगा जाळताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. असे केले जाते, कारण पूजेपूर्वी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते.

2. आकस्मिक धन लाभ उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्हाला अचानक धन आणि पैशाची कमतरता जाणवत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी घरातील चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळावा. यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही आणि असे केल्याने अचानक धनलाभ होण्याच्या संधीही मिळतील.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

3. लवंग जाळण्याचे फायदे -

शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते. विज्ञानानुसार, लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu