जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / घराच्या मुख्य दारात ठेवा या गोष्टी, लक्ष्मी होते प्रसन्न, धनप्रवेशाचा मार्ग होतो सुकर

घराच्या मुख्य दारात ठेवा या गोष्टी, लक्ष्मी होते प्रसन्न, धनप्रवेशाचा मार्ग होतो सुकर

घराच्या मुख्य दारात ठेवा या गोष्टी, लक्ष्मी होते प्रसन्न, धनप्रवेशाचा मार्ग होतो सुकर

घराच्या मुख्य दारावर तुळशीचे रोप लावल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मे: हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीला देवीचा आशीर्वाद मिळावा आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरी राहावा अशी इच्छा असते. वास्तुशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल आणि कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

वास्तुशास्त्रात अशा काही शुभ गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या मुख्य दारावर ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन अशा घरांमध्ये वास करते. तुळशीचे रोप घराच्या मुख्य दारावर तुळशीचे रोप लावल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात असे मानले जाते. शुभचिन्ह घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला शुभ चिन्ह लावणे किंवा कुंकुमने चिन्ह लावणे खूप शुभ मानले जाते. अशा घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही. यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण होते आणि आर्थिक स्थितीही सुधारते. धनदेवता कुबेराला प्रसन्न करायचे असेल तर घराच्या या दिशेला लावा हे रोप तोरण कोणत्याही शुभ कार्यादरम्यान घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावले जाते. तोरण लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते, अशी यामागे एक श्रद्धा आहे. म्हणूनच घरोघरी, दिवाळीसारख्या शुभप्रसंगी घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावले जातात. सुगंधी फुलांची रोपटी वास्तुशास्त्रात अनेक सकारात्मक रोपे सांगितली आहेत, जी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली जाऊ शकतात. परंतु शुक्रवारी घराच्या मुख्य दारावर सुगंधी फुलांची रोपे लावल्यास घराची आर्थिक स्थिती मजबूत होते. महिन्याच्या अखेरीस शुक्राचे संक्रमण, या 3 राशींना आर्थिक क्षेत्रात राहावे लागेल सावध देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे ज्या घराच्या मुख्य दारावर लक्ष्मीच्या पाऊलखुणा किंवा चित्र असते, तिथेही लक्ष्मीचा वास असतो. यासोबतच अशा घरात सुख-समृद्धी राहते आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. याशिवाय रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी टाकतात. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात तिथे लक्ष्मी देवी कधीच राहत नाही. म्हणूनच रात्री भांडी स्वच्छ करूनच झोपा. ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये, ही दिशा मंदिराची जागा मानली जाते. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते. जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजाघरात अवश्य ठेवा. रोज पूजा करताना हा शंख वाजवा. असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात