जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Kartiki Ekadashi 2022 : महत्त्व, पूजा विधी आणि उपवास सोडण्याची वेळ; कार्तिकी एकादशीची संपूर्ण माहिती

Kartiki Ekadashi 2022 : महत्त्व, पूजा विधी आणि उपवास सोडण्याची वेळ; कार्तिकी एकादशीची संपूर्ण माहिती

Kartiki Ekadashi 2022 : महत्त्व, पूजा विधी आणि उपवास सोडण्याची वेळ; कार्तिकी एकादशीची संपूर्ण माहिती

हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी कार्तिक एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. या एकादशीचे व्रत कसे असते असते आणि पूजा करण्याची वेळ कोणती हे जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 नोव्हेंबर : हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिक एकादशी म्हणतात. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी चातुर्मास संपतो. कारण या तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रातून बाहेर पडतात. चातुर्मासाच्या शेवटी, भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचे संचालन करण्याची जबाबदारी घेतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत करण्याचा नियम आहे. कार्तिकी एकादशीपासून मांगलिक कार्याला सुरुवात होते. आपल्याकडे लोक खूप भक्तिभावाने प्रत्येक एकादशीचा उपवास करतात. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया की, कार्तिकी एकादशीचे व्रत कसे असते असते आणि पूजा करण्याची वेळ कोणती

प्रबोधिनी एकादशी दिवशी करा ही 5 कामं, भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

कार्तिकी एकादशी 2022 तिथी पंचांगानुसार कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवार, 03 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 07.30 पासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार, ०४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०६:०८ वाजता संपेल. अशा स्थितीत उदयतिथीच्या आधारे कार्तिकी एकादशीचे व्रत 04 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कार्तिकी एकादशी 2022 पूजा मुहूर्त 04 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी सकाळी 06:35 ते 10:42 या वेळेत भगवान विष्णूची पूजा करावी. यावेळी देखील सकाळी 07:57 ते 09:20 पर्यंत लाभ-अग्रिम मुहूर्त आहे आणि सकाळी 09:20 ते सकाळी 10:42 पर्यंत अमृत-उत्तम मुहूर्त आहे. कार्तिकी एकादशी विधी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून व्रत करावे. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. हा दिवस विष्णू देवाला जागृत करण्यासाठी असतो अशी मान्यता आहे. शंख आणि घंटा वाजवून त्यांना जागृत केले जाते. यानंतर भगवान विष्णूसमोर दिवा आणि उदबत्ती लावा. त्यानंतर त्यांना फळे, फुले आणि भोग अर्पण करावेत. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीचा नैवेद्य दाखवावा, असेही म्हणतात. संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करताना विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. एकादशीच्या पूर्वसंध्येला सात्विक अन्नच खावे. एकादशीच्या व्रतामध्ये अन्न सेवन केले जात नाही. एकादशीला तांदूळ खाण्यास मनाई आहे. एकादशीचे व्रत सोडल्यानंतर ब्राह्मणांना दान आणि दक्षिणा द्या. कार्तिकी एकादशी उपवास समाप्ती मुहूर्त कार्तिकी एकादशीचा उपवास शनिवार, 5 नोव्हेंबरला सकाळी 06:36 ते 08:47 या दरम्यान सोडावा. या दिवशी द्वादशी तिथी संध्याकाळी 05:06 वाजता समाप्त होईल.

Tulsi Vivah 2022 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय; वैवाहिक आयुष्यातील समस्या होतील दूर

कार्तिकी एकादशीचे महत्त्व कार्तिकी एकादशीला मांगलिक कार्यांच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे, कारण या तिथीपासून लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी मंगल कार्यांना सुरुवात होते. देवशयनी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत चार महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण भगवान विष्णू हे चार महिने योगनिद्रामध्ये राहतात. या एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूची आराधना केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजनही केले जाते. तुळशीविवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणीही दूर होतात. यावेळी तुळशी विवाह कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात