मुंबई, 03 नोव्हेंबर : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार अनेक ठिकाणी या दिवशी तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह होतो. या दिवसापासून मांगलिक कामे सुरू होतात. हिंदू पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आपल्या 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि पृथ्वीची जबाबदारी आपल्या हातात घेतात. या दिवशी महिला आणि पुरुष सर्व आपापल्या घरी तुळशीची आणि भगवान शालिग्रामची पूजा करून विधीपूर्वक विवाह करतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा प्रबोधिनी एकादशीला करण्याचे काही सोपे उपाय सांगत आहेत. 1) श्रद्धेनुसार, प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपले घर पूर्णपणे स्वच्छ करावे. यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीवत पूजा केल्यानंतर रात्रभर त्यांच्यासमोर अखंड दिवा ठेवावा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 2) हिंदू पौराणिक मान्यतेनुसार प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूच्या ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप केल्यानेही लाभ होतो. 3) प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा. धार्मिक श्रद्धेनुसार असे केल्याने व्यक्तीला शुभ गुण प्राप्त होतात. त्याच वेळी, सर्व दुःखांचा अंत होतो. याशिवाय पांढर्या रंगाची मिठाई भगवान विष्णूला अर्पण करावी, असे केल्याने संपत्ती वाढते. 4) मान्यतेनुसार प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी घरामध्ये सुख-समृद्धीसाठी देवाला नारळ आणि बदाम अर्पण करावेत. असे केल्याने तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ लागते. याशिवाय प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना पिवळ्या वस्तू दान केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, असे मानले जाते.
- प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केली जाते. संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा. यासोबतच भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करून माता तुळशी भोवती 11 वेळा प्रदक्षिणा करा. असे केल्याने तुमच्या घरात धन-धान्याचे साठे नेहमी भरलेले राहतात. हे वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)