जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / kamika ekadashi 2023: आषाढातील दुसरी एकादशी येत्या गुरुवारी; पहा पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व

kamika ekadashi 2023: आषाढातील दुसरी एकादशी येत्या गुरुवारी; पहा पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व

कामिका एकादशीचे महत्त्व

कामिका एकादशीचे महत्त्व

Kamika Ekadashi 2023: चातुर्मासातील हे दुसरे एकादशीचे व्रत आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी कामिका एकादशीचे व्रत कधी आहे? विष्णुपूजेचा मुहूर्त आणि उपवास सोडण्याची वेळ याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जुलै : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते. या व्रताचे पालन केल्याने पापांचा नाश होतो, मोक्ष प्राप्त होतो आणि जो कामिका एकादशी व्रताची कथा श्रवण करतो त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, असे मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. कामिका एकादशीच्या दिवशी लोक उपवास करून भगवान विष्णूची पूजा करतात. चातुर्मासातील हे दुसरे एकादशीचे व्रत आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी कामिका एकादशीचे व्रत कधी आहे? विष्णुपूजेचा मुहूर्त आणि उपवास सोडण्याची वेळ याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ. कामिका एकादशी 2023 - हिंदू कॅलेंडरनुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी बुधवार, 12 जुलै रोजी सायंकाळी 05.59 वाजता सुरू होईल. ही तिथी गुरुवार, 13 जुलै रोजी संध्याकाळी 06:24 पर्यंत वैध असेल. उदयतिथीवरून गुरुवारी, 13 जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत केले जाणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कामिका एकादशी 2023 पूजेची वेळ - 13 जुलै रोजी कामिका एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 05.32 ते 07.16 पर्यंत आहे. त्यानंतर सकाळी 10.43 ते दुपारी 03.45 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूजा करू शकता. त्या दिवशीचा अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 ते दुपारी 12:54 पर्यंत आहे. उपवास सोडण्याची वेळ - शुक्रवार, 14 जुलै रोजी कामिका एकादशीची द्ववादशी साजरी केले जाणार आहे. त्या दिवशी तुम्ही सकाळी 05.32 ते 08.18 पर्यंत उपवास सोडू शकता. त्या दिवशी द्वादशी तिथी सकाळी 07.17 वाजता समाप्त होईल. चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा कामिका एकादशी व्रताचे महत्त्व - एकदा युधिष्ठिराने आषाढ कृष्ण एकादशीबद्दल जाणून घेण्याची इच्छा भगवान श्रीकृष्णाकडे व्यक्त केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, आषाढातील दुसऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. या व्रताचे पालन केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. विष्णूच्या कृपेने त्याला मोक्ष मिळतो. या एकादशी व्रताचे महत्त्व तीर्थक्षेत्रात स्नान करण्यासारखेच आहे. कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याला तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात