Janmashtami 2022: गोपाळकृष्णाच्या जन्माची ही कहाणी तुम्हाला माहीत नसेल; म्हणून रात्री झाला होता जन्म

Janmashtami 2022: गोपाळकृष्णाच्या जन्माची ही कहाणी तुम्हाला माहीत नसेल; म्हणून रात्री झाला होता जन्म

हिंदू मान्यतेनुसार, अष्टमी तिथीच्या रात्री श्रीकृष्ण जन्म घेण्यामागील मुख्य कारण म्हणजे ते चंद्रवंशी आहेत. त्यांचे पूर्वज चंद्रदेव आहेत आणि बुध हा चंद्राचा पुत्र आहे, म्हणून भगवान श्रीकृष्णाने रात्री अवतार घेण्याची वेळ निवडली. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव दरवर्षी रोहिणी नक्षत्रात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यंदा गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालगोपाल स्वरूपाची विधिवत पूजा केली जाते. कृष्ण जन्माष्टमीला रात्रीच्या वेळी श्रीकृष्णाची पूजा करण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की, भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री झाला होता, म्हणूनच रात्री त्यांची पूजा केली (Janmashtami 2022) जाते.

हिंदू मान्यतेनुसार, अष्टमी तिथीच्या रात्री श्रीकृष्ण जन्म घेण्यामागील मुख्य कारण म्हणजे ते चंद्रवंशी आहेत. त्यांचे पूर्वज चंद्रदेव आहेत आणि बुध हा चंद्राचा पुत्र आहे, म्हणून भगवान श्रीकृष्णाने रात्री अवतार घेण्याची वेळ निवडली. लखनौचे पंडित गोविंद पांडे यांच्याकडून जाणून घेऊया श्रीकृष्णाचा रात्री जन्म होण्याचे कारण काय होते.

म्हणून रात्री जन्म घेतला -

भगवान कृष्ण हा देवकीचा आठवा पुत्र आणि भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. गोविंद पांडे सांगतात की, भगवान कृष्णाचा रात्री जन्म होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ते चंद्रवंशी आहेत. ज्याप्रमाणे भगवान राम सूर्यवंशी आहेत, त्यांचा जन्म सकाळी झाला, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण चंद्रवंशी आहेत, त्यामुळे त्यांचा जन्म रात्री झाला. रात्री चंद्र उगवतो, म्हणून कृष्ण रात्री जन्मले आणि त्यांच्या पूर्वजांच्या उपस्थितीत जन्माला आले.

पूर्वज चंद्रदेवांचीही इच्छा होती की, जर भगवान विष्णू कृष्णाच्या रूपात माझ्या कुळात जन्म घेत असतील तर मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडेल. पौराणिक शास्त्रांमध्ये असा उल्लेख आहे की, कृष्ण अवताराच्या वेळी पृथ्वी जगापासून अंतराळापर्यंत संपूर्ण वातावरण आनंदाने भरलेले होते.

हे वाचा -  Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे?

हे देखील एक कारण होते -

भगवान श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला. कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही मध्यरात्रीची निवड केली. जेणेकरून त्याचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील, म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला, तेव्हाच तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले. त्यानंतर त्यांचे वडील वासुदेव गोकुळात सुखरूप पोहोचल्यानंतर पुन्हा तुरुंगात गेले.

हे वाचा - Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंध

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 17, 2022, 7:37 AM IST

ताज्या बातम्या