जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शास्त्रानुसार 'या' तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम

शास्त्रानुसार 'या' तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम

शास्त्रानुसार 'या' तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम

स्त्री-पुरुषांचे संबंध सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक समजुतीनुसार होत असेल, तर ती एक पवित्र घटना आहे असे मानले जाते. परंतु काही अशा तिथी असतात, ज्यावेळी स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणे अशुभ असते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 ऑक्टोबर : लग्नानंतर स्त्री-पुरुषांचे शारीरिक संबंध शास्त्रशुद्ध आणि पवित्र मानले जाते. स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. स्त्री-पुरुषांचे संबंध सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक समजुतीनुसार होत असेल, तर ती एक पवित्र घटना आहे असे मानले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का? शास्त्रानुसार, काही अशा तिथी असतात, ज्यावेळी स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणे टाळले पाहिजे. लोकांच्या धारमक श्रद्धेनुसार, विवाहानंतर स्त्री-पुरुषांचे शारीरिक संबंध वैध असतात. परंतु विवाह बंधनाशिवाय स्त्री-पुरुष एकत्र येणे हे वाईट आणि अपवित्र कृत्य मानले जाते. लग्नानंतर स्त्री-पुरुषाचे नाते पूर्णपणे शुद्ध आणि समाज मान्यतेनुसार निर्माण झालेले असते. परंतु शास्त्रानुसार, असेही काही दिवस असतात जेव्हा विवाहित स्त्री पुरुषांनी देखील संबंध ठेऊ नये. कारण वाईट परिणाम परिणाम होऊ शकतो. पाहूया कोणत्या आहेत त्या तिथी.

News18लोकमत
News18लोकमत

vastrology या इंस्टाग्राम चॅनेलवर याविषयी माहितीदेण्यात आली आहे. यानुसार, शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, स्त्री-पुरुषांनी अष्टमी, एकादशी आणि अमावास्येच्या रात्री संबंध ठेऊ नये. कारण यामुळे घरात धन समृद्धीची कमतरता निर्माण होते. त्याचबरोबर घरात वादविवाद आणि नातेसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. वैवाहिक लाईफ सुखी राहण्यासाठी या 5 टिप्स लक्षात ठेवा; बघा किती बदलेले जीवन या तिथींना ठेऊ नये शारीरिक संबंध नवरात्री नवरात्रीच्या पर्वत सर्व लोक घरात देवीची आणि कलशाची स्थापना करतात. अशावेळी घरात सर्वकाही पवित्र असणं अवषयक आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेऊ नये. अमावस्या शास्त्रानुसार, अमावस्येला स्त्री पुरुषांनी एकत्र येऊ नये. कारण यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पौर्णिमा पौर्णिमेच्या तिथीलादेखील स्त्री पुरुषांनी संबंध प्रस्थापित करणे टाळावे. कारण या तिथीला वाईट शक्ती सक्रिय असतात. त्याचाही परिणाम नात्यावर होऊ शकतो.

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांची ही असते खासियत; त्यांचे हे 5 गुण छाप पाडतात

संक्रांत संक्रांतीलादेखील शारीरिक संबंध ठेवणे अशुभ मानले जाते. या तिथीला एकत्र आल्यास स्त्री पुरुषाच्या नात्यावर याचा वाईट परिणाम होतो. पितृपक्ष पितृपक्षादरम्यान सॅरकॅजन आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. या काळातही स्त्री पुरुषांचे संबंध अशुभ मानले गेले आहेत.

जाहिरात

व्रतादरम्यान एखादी व्यक्ती कोणत्याही दिवशी कओ देवाचे व्रत किंवा उपवास करत असेल. तर त्या दिवशी त्या व्यक्तीने शारीरिक संबंध टाळावेत. संपूर्ण पवित्र होऊन देवाची पूजा अर्चना करावी. याने तुमचे व्रत सफल होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात