जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / वैवाहिक लाईफ सुखी राहण्यासाठी या 5 टिप्स लक्षात ठेवा; बघा किती बदलेले जीवन

वैवाहिक लाईफ सुखी राहण्यासाठी या 5 टिप्स लक्षात ठेवा; बघा किती बदलेले जीवन

वैवाहिक लाईफ सुखी राहण्यासाठी या 5 टिप्स लक्षात ठेवा; बघा किती बदलेले जीवन

Tips For Married Life: वैवाहिक जीवन म्हटलं की, प्रेमासोबत थोडे भांडण-तंटेही आलेच, रुसवे-फुगवे होतात, मात्र हे लक्षात घ्या की, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावरच जास्त रुसतो, रागावतो. तो राग क्षणिक असावा.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक असा टर्निंग पॉइंट असतो, ज्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. दोन व्यक्तींना एकत्र बांधणारा पवित्र विधी म्हणजे विवाह, असे म्हणता येईल. वैवाहिक जीवन म्हटलं की, प्रेमासोबत थोडे भांडण-तंटेही आलेच, रुसवे-फुगवे होतात, मात्र हे लक्षात घ्या की, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावरच जास्त रुसतो, रागावतो. तो राग क्षणिक असावा. पती-पत्नीमधील नाराजी फार काळ टिकत नाही, परंतु काहीवेळा विवाहित जोडप्यांकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. पती-पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी काही खास टिप्स पाळल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचे नाते आयुष्यभर मजबूत राहील. एकमेकांसोबत वेळ घालवा - Vspath.com च्या मते, विवाहित जोडप्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. यासाठी किमान रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला. आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला जा. यामुळे वाद-विवादाची परिस्थिती कमी राहते. मतभेदाबद्दल बोला - प्रत्येक नवरा-बायकोमध्ये भांडणे होतात आणि ते अगदी कॉमन आहे. कधीकधी अशी वेळ येते की, भांडण नियंत्रणाबाहेर जाते, जे भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या असुरक्षित असू शकते. एकमेकांशी बोलून कोणतीही समस्या सोडवता येते. विषय बोलून सोडवा. एकमेकांचा आदर करा - जेव्हा तुम्ही एकमेकांना आदर देता तेव्हा नाती वेगळ्या प्रकारे फुलतात. यामुळे नात्यात कधीही नकारात्मकता निर्माण होत नाही. तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून जशी अपेक्षा आहे, तशी वागणूक द्या. हे वाचा -  डायबेटिजला रोखण्याचा सोपा मार्ग; लक्षणं दिसताच त्वरित करा हे 5 उपाय एकमेकांना माफ करा - जर तुमच्या पार्टनरने काही चूक केली असेल तर त्याला माफ करायलाही शिका. कारण कधी कधी काही गोष्टींमुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात. प्रत्येकांमध्ये कमतरता असतात. त्यावरून नेहमी वाद घालण्यापेक्षा दुर्लक्ष करत एकमेकांना माफ करण्याचीही सवय लावा.

News18लोकमत
News18लोकमत

एकमेकांमध्ये चांगले शोधा - जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सोबत असता तेव्हा त्याच्या/तिच्यातील वाईट गोष्टी शोधण्याऐवजी त्याच्यातील चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते, काहीतरी कमतरता दोष असतात. कमतरता असलेल्या त्याच गोष्टींवर बोलत राहुन वेळ घालवण्याऐवजी तिच्या चांगल्या गुणावर लक्ष देऊन त्यावर आधारित काही घरगुती व्यवसायही सुरू करता येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात