मराठी बातम्या /बातम्या /religion /हिंदू नववर्षाचा बुध ग्रह झाला राजा, तर मंत्रिपद शुक्र ग्रहाकडे, कसा राहील प्रभाव

हिंदू नववर्षाचा बुध ग्रह झाला राजा, तर मंत्रिपद शुक्र ग्रहाकडे, कसा राहील प्रभाव

बुधाच्या प्रभावामुळे उत्साह आणि आनंद दिसून येईल.

बुधाच्या प्रभावामुळे उत्साह आणि आनंद दिसून येईल.

बुधाच्या प्रभावामुळे उत्साह आणि आनंद दिसून येईल.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च:   हिंदू नववर्ष म्हणजेच विक्रम संवत 2080 या वर्षी 22 मार्चपासून सुरू झाला आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला हिंदू नववर्ष सुरू होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या वेळी हिंदू नववर्षात बुध ग्रह राजाच्या भूमिकेत असेल, तर शुक्र ग्रह मंत्री असेल. एवढेच नाही तर हे दोन ग्रह मिळून हिंदू नववर्ष शुभ बनवणार आहेत.

या वर्षी हिंदू नववर्षाची सुरुवात अनेक शुभ योगांनी होत आहे, ज्यामध्ये 22 मार्चला शुक्ल आणि ब्रह्मयोगदेखील तयार होत आहेत. ज्योतिषांच्या मते विशेषत: बुध जेव्हा हिंदू नवीन वर्षाचा राजा असेल तेव्हा लोकांच्या व्यवसायात वाढ होईल. चित्रकार, कारागीर, लेखक आणि वैद्यक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होईल. बुधाच्या प्रभावामुळे उत्साह आणि आनंद दिसून येईल.

आजपासून ग्रहांची ही असेल चाल

ज्योतिषांच्या मते, सामान्य लोकांसोबतच त्याचा प्रभाव पृथ्वीवरही दिसून येतो. मुसळधार पाऊस, वादळ, चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, शुक्र मंत्रिपदावर असल्यास मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. रोगांपासून मुक्ती मिळेल. त्याच वेळी, हिंदू नववर्षात ग्रहांच्या हालचालीत बदल होईल, जे महत्त्वाचे मानले जाते.

हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि गुरू मीन राशीत असतील, त्यानंतर शनि कुंभ राशीत आणि मंगळ मिथुन राशीत असेल. तर शुक्र आणि राहू मेष राशीत आणि केतू तूळ राशीत असतील.

भारताच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम सांगतात की या हिंदू नववर्षात बुध राजा असेल आणि शुक्र मंत्री असेल. बुध ग्रह राजा झाल्यामुळे देशात आणि जगात खूप उलथापालथ होईल. हवामानात चढ-उतार असतील. दुसरीकडे शुक्राला मंत्रिपद मिळाल्याने जागतिक स्तरावर महिलांचे वर्चस्व वाढेल. असा संकेत शुक्र मंत्रिपदावरून मिळतो. एवढेच नाही तर हे हिंदू नववर्ष संपूर्ण जगात भारताला एक नवा आयाम देईल. भारताच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. जागतिक स्तरावर भारत यशाचे नवे परिमाण प्रस्थापित करेल. अनेक क्रांतिकारी घटनाही घडू शकतात, ज्याचे पडसाद जगभर पाहायला मिळतील.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion