जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / आदर्श कुटुंबप्रमुख कसा असावा? चाणक्यनीती मध्ये म्हटलंय...

आदर्श कुटुंबप्रमुख कसा असावा? चाणक्यनीती मध्ये म्हटलंय...

आदर्श कुटुंबप्रमुख कसा असावा? चाणक्यनीती मध्ये म्हटलंय...

चाणक्यांनी त्यांच्या ‘चाणक्य नीति’ या ग्रंथात कौटुंबिक जीवनासंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 फेब्रुवारी:  आचार्य चाणक्य यांनी जगाला कूटनीती आणि राजकारणाचं महत्त्वाचं ज्ञान दिलं. चाणक्य यांनी कुटुंबाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी त्यांच्या ‘चाणक्य नीति’ या ग्रंथात कौटुंबिक जीवनासंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. भलेही अनेकांना त्या कठोर वाटत असल्या तरी लोकांचं जीवन सुकर करण्याचा योग्य मार्ग दाखवतात. या उपायांचा अवलंब केल्यानं कोणतीही व्यक्ती स्वतःसोबत त्याच्या कुटुंबाचं जीवन आनंदी बनवू शकते. चाणक्य यांनी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी अर्थात कुटुंबप्रमुखासाठीही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ‘अमर उजाला’ने याबाबत वृत्त दिलंय. प्रसिद्ध मुत्सद्दी, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी म्हणून आचार्य चाणक्य प्रसिद्ध होते. चाणक्याच्या मुत्सद्देगिरीमुळे चंद्रगुप्त सम्राट झाला. त्यांनी अर्थशास्त्र व्यतिरिक्त नीतिशास्त्राची रचना केली. त्यांचे नीतिशास्त्र सध्याच्या काळातसुद्धा सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. यामध्ये व्यक्तीला सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजकीय धोरण कसं असावं, याबाबतचा दृष्टिकोन मिळतो. अशा अनेक धोरणांचा उल्लेख ‘चाणक्य नीति’मध्ये करण्यात आलाय, ज्यामुळे तुम्हाला यशाच्या मार्गावर जाता येईल. मन अस्वस्थ असेल काहीच सुचत नसेल तर निर्णय कसा घ्याल? जाणून घ्या इथे कोणत्याही घराची, कुटुंबाची प्रगती ही त्या कुटुंबाच्या प्रमुखावर अवलंबून असते, असे आचार्य म्हणतात. कुटुंब प्रमुख शहाणा असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या कुटुंबाला सोबत घेऊन जातो. कुटुंबाला संकटातून बाहेर काढतो. त्यामुळेच कुटुंब प्रमुखामध्ये काही गुण असले पाहिजेत. ‘चाणक्य नीति’नुसार, जर कुटुंब प्रमुखामध्ये काही विशेष गुण नसतील, तर त्या घरात कधीही सुख, शांती, समृद्धी येत नाहीत. चला तर, आचार्य चाणक्य यांच्या मते कुटुंब प्रमुखामध्ये नेमके कोणते गुण हवेत, त्याबाद्दल जाणून घेऊ. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेणं आचार्य चाणक्य यांच्या मते, कुटुंब प्रमुख जेव्हाही निर्णय घेतो, तेव्हा त्याने त्याच्या निर्णयामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं नुकसान होणार नाही, याची खात्री करणं गरजेचं असतं. खर्चावर हवं नियंत्रण आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे की, त्यानं कमावलेल्या पैशांनुसार घरातील खर्चाचं नियोजन करावं. कुटुंब प्रमुखानं स्वतः अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं, तसंच कुटुंबातील इतर सदस्यांनाही तसं करण्यास सांगाव. जर कुटुंब प्रमुखानं असं केलं नाही, तर त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. निर्णयावर ठाम राहा जेव्हा कुटुंब प्रमुख जो काही निर्णय घेतो, व तो त्यावर ठाम असतो तेव्हाच कुटुंबाची प्रगती होते. कुटुंब प्रमुखानं घरात शिस्तबद्ध वातावरण राखलं पाहिजे. असं केल्यानं घरातील सदस्यांची प्रगती होईल. कशी कराल दिवसाची सुरुवात? फक्त अंघोळ आणि देवपूजा पुरेशी नाही तर.. हलक्या कानाचा नसावा कुटुंब प्रमुख हा हलक्या कानाचा नसावा. त्यानं पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. घरात काही वाद सुरू असेल, तर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानंतर वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. पैसे वाचवणं ‘चाणक्य नीति’नुसार कुटुंब प्रमुखानं पैशाची बचत करावी. भविष्यात पैशांची गरज पडल्यानंतर कोणाचीही मदत घेण्याची गरज पडू नये, म्हणून पैशांची बचत करणं ही कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. दरम्यान, कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये आणि ते बिघडण्यामागे काही प्रमाणात कुटुंब प्रमुखाचा हात असतो. नातेसंबंध जपण्यासाठी कुटुंब प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यानं काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात