जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Rashibhavishya: वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल; कसा असेल 8 जुलैचा दिवस?

Rashibhavishya: वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल; कसा असेल 8 जुलैचा दिवस?

08 जुलै 2023 राशीभविष्य

08 जुलै 2023 राशीभविष्य

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

आजच्या राशिभविष्यात प्रत्येक राशीसाठी काही ना काही विशेष गोष्ट आहे. त्यातून तुम्ही शक्यतांच्या गूढ दुनियेत प्रवेश कराल. विवाहाच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींचं नातं इच्छा आणि समजूतदारपणानं बहरलेलं असेल. वृषभ राशीच्या व्यक्तींचं नातं मोकळ्या संवादानं दृढ होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींचं नातं बौद्धिक स्तरावर दृढ असेल. कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक आधार मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींना यश आणि आपुलकी मिळेल. कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या वास्तववादातही स्थैर्य मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या नात्यात तीव्र भावना असतील. तूळ राशीच्या व्यक्ती शांततेचा अनुभव घेतील. धनू राशीच्या व्यक्तींना साहस हवं असेल. मकरेच्या व्यक्ती नात्याचा मजबूत पाया रचतील. कुंभ राशीच्या व्यक्ती बौद्धिक उत्तेजनांना प्रोत्साहन देतील. मीन राशीच्या व्यक्ती दयेच्या भावनेचा आदर ठेवतील. प्रत्येक राशीचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं. मेष (Aries)  आज जोडीदारासोबतचं नातं नव्या उत्सुकतेनं व समजूतदारपणानं बहरेल. जसजसे प्रेमाचे बंध मजबूत कराल आणि नातं आणखी दृढ करण्याचा प्रयत्न कराल, तसतसं ते अधिकच बहरत जाईल. कामाच्या ठिकाणी उत्साह आणि कामाच्या प्रती निष्ठा दाखवू शकाल. त्याची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. योगासनं, मेडिटेशनसारखे मनाची शांतता देणारे व्यायाम तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणण्याचं काम करतील. सुयोग्य आहार आणि व्यायाम याद्वारे नेहमी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. LUCKY Crystal – Sun Stone LUCKY Color - Red LUCKY Number - 14

News18लोकमत
News18लोकमत

वृषभ (Taurus)  आजचा दिवस जोडीदारासोबतचा संवाद सुधारण्यासाठी चांगला आहे. तसंच तुमच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्याबाबत प्रामाणिकपणे व्यक्त होण्यासाठीही हा दिवस चांगला आहे. सौहार्दाचं नातं तयार करण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमची निष्ठा आणि व्यासंग तुम्हाला यश आणि सहकाऱ्यांचा आदर मिळवण्यासाठी मदत करील. पेंटिंग आणि बागकामासारखा छंद जोपासून तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि जुन्या आठवणींमध्ये रमाल. विश्रांती करण्याला प्राधान्य द्या. तब्येतीची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करा. LUCKY Crystal – Rose Quartz LUCKY Color – Green LUCKY Number - 5 मिथुन (Gemini)  आज लोकांसोबतच्या बौद्धिक चर्चांनी तुमचा दिवस आणखी छान होईल. महत्त्वाच्या विषयांवर बोला आणि तुमच्या कल्पनांबाबत प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी अवघड परिस्थितीतून वाट काढण्यासाठी प्रसंगावधान आणि जुळवून घेण्याची क्षमता मदत करील. लेखन किंवा वाचन यांसारख्या गोष्टी तुम्हाला विचारांमध्ये स्पष्टता देण्यासाठी उपयोगी ठरतील. पुरेशी झोप आणि पौष्टिक अन्न घेऊन आरोग्याला प्राधान्य द्या. LUCKY Crystal – Clear Quartz LUCKY Color - Yellow LUCKY Number - 9

News18लोकमत
News18लोकमत

कर्क (Cancer)  भावनिक आधार आणि करुणा यामुळे तुमचं प्रेममय जीवन आज बहरेल. जोडीदारासोबत चांगला वेळ एकत्र घालवल्यानं आणि तुमचं प्रेम व्यक्त केल्यामुळे नातं मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःच्या मनाचा आवाज ऐका आणि पुरेशी जोखीम पत्करा. स्वयंपाक करण्याची व बागकामाची तुमची आवड तुम्हाला शांतता व आनंद देऊ शकेल. संतुलित दिनक्रम ठेवा. पाणी भरपूर प्या. LUCKY Crystal - Labradorite LUCKY Color - Silver LUCKY Number - 7 सिंह (Leo)  प्रेम आणि काहीशा प्रमाणात इच्छा या भावनांचा आज तुमच्यावर प्रभाव राहील. जोडीदारासमोर प्रेम आणि कौतुक व्यक्त करा. कामाच्या ठिकाणी उत्साह आणि नेतृत्वगुण यांमुळे रेंगाळलेली कामं पूर्ण करण्यात मदत होईल. मूड चांगला करण्यासाठी डान्स किंवा एखादं वाद्य वादनाचा प्रयत्न करा. व्यायामाचं नियोजन करून स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या. स्वतःला आनंदी ठेवा. LUCKY Crystal - Amber LUCKY Color - Gold LUCKY Number - 18 प्रेमविवाहासाठी प्रपोज करण्यास वेळ अनुकूल! शुक्राची ग्रहस्थिती या राशींना लाभणार कन्या (Virgo)  आज वास्तववादी दृष्टिकोन ठेवण्याचा व तपशीलांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंधात स्थैर्य आणि विश्वास संपादित करण्यावर भर द्या. तुमचा तपशीलवारपणा आणि सगळ्याचं योग्य व्यवस्थापन करण्याची क्षमता आज तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मदत करील. कोडी, सुडोकू या गोष्टी विचार विकसित करण्यासाठी मदत करतील. स्वतःची काळजी घेऊन तसंच संतुलित आहार घेऊन तब्येत सांभाळा. LUCKY Crystal – Lapis Lazuli LUCKY Color – Navy Blue LUCKY Number - 3 तूळ (Libra)  तडजोडीची वाट निवडली असेल आणि नात्यात समतोल राखण्याची धडपड करत असलात, तर आज नात्यात एकोपा राखण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी युक्ती आणि सहकार्य यश मिळवून देईल. पेंटिंग करून किंवा एखाद्या आर्ट गॅलरीला भेट देऊन तुम्ही स्वतःला प्रेरित करू शकता. कठोर पथ्य पाळून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. LUCKY Crystal - Rhodonite LUCKY Color – Pink LUCKY Number - 11 Shukra gochar: या 4 राशींना विशेष दक्ष राहावं लागणार, काय आहे कारण? वृश्चिक (Scorpio)  प्रेमाच्या नातेसंबंधांसाठी आजचा दिवस भावनिक असेल. नातं अधिक घट्ट करण्यासाठी भावनिक गुंतागुंत स्वीकारा आणि तुमच्या गरजा प्रामाणिकपणे व्यक्त करा. दृढता आणि साधनसंपत्ती यामुळे कामात महत्त्वाचं यश मिळू शकतं. दीर्घ श्वसन आणि मेडिटेशन यांच्या साह्याने मानसिक शांतता मिळवू शकता. शरीराची गरज ओळखून त्याकडे लक्ष द्या. नियमित दिनचर्या ठेवा. LUCKY Crystal - Garnet LUCKY Color - Black LUCKY Number - 22 धनू (Sagittarius)  तुमचा दिवस आता उत्स्फूर्तता आणि साहसाच्या काही रंगांनी रंगून जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नातं जोडण्याच्या नवीन संधींचा स्वीकार करा आणि कायमस्वरूपी आठवणी बनवा. कामाच्या ठिकाणी तुमची आवड आणि आशावादी मानसिकता तुम्हाला यशस्वी होण्यास आणि तुमची दखल घेण्यास मदत करू शकते. हायकिंग किंवा निसर्ग निरीक्षण यांसारख्या गोष्टींमध्ये भाग घेऊन तुम्हाला आनंद आणि प्रेरणा मिळू शकते. सक्रिय राहून आणि तुमच्या आहारात पौष्टिक जेवणाचा समावेश करून आरोग्याला प्राधान्य द्या. LUCKY Crystal - Amethyst LUCKY Color - Purple LUCKY Number - 27 सूर्याचे राशीपरिवर्तन करेल मालामाल! या राशीच्या लोकांना ‘लॉटरी’ लागू शकते मकर (Capricorn)  आयुष्यात स्थिरतेची गरज दाखवण्यासाठी जोडीदार तुमच्यासोबतच्या बांधिलकीचा वापर करील. नात्याचा पाया मजबूत करण्याकडे लक्ष द्या. नोकरीची इच्छा आणि गरज आता पूर्ण होईल. तुम्हाला यात यश मिळेल. आयुष्याला शिस्त लावा. नियोजन व व्यवस्थापनाच्या कामात सहभागी व्हा. संतुलित दिनक्रम ठेवून आरोग्याला प्राधान्य द्या. शरीराच्या गरजा स्वीकारा. LUCKY Crystal – Tiger’s Eye LUCKY Color - Brown LUCKY Number - 10 कुंभ (Aquarius)  तुमचं जीवन आत्ता कुटुंबासोबतच्या खुल्या मनाच्या संवादांनी आणि बौद्धिक उत्तेजनाने भरलेलं असू शकतं. तुमच्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिमान बाळगा आणि त्याला पाठिंबा द्या. तुमचे मूळ विचार आणि पुरोगामी विचारसरणीमुळे तुम्ही कामात वेगळं स्थान मिळवू शकता. विचारमंथन किंवा व्याख्यानाला गेल्यास ज्ञानात वाढ होऊ शकते. दैनंदिन व्यवहारात ध्यान करून आणि विश्रांतीच्या पद्धती वापरून आरोग्याला प्राधान्य द्या. LUCKY Crystal - Amazonite LUCKY Color - Turquoise LUCKY Number - 15 स्वप्नात या 5 गोष्टी दिसणं शुभ संकेत मानतात; अचानक चमकू शकतं नशीब मीन (Pisces)  आज दिवसभरात तुम्हाला करुणा आणि सहानुभूतीचा अनुभव येईल. जोडीदारासाठी प्रेमळ वातावरण तयार करा, त्यांना भावनिक आधार द्या. सर्जनशीलता आणि अंतर्मनाचा आवाज ऐकून तुम्ही कामाच्या ठिकाणी यश मिळवू शकता. मन प्रसन्न ठेवण्यासाठी वहीत लेखन करा किंवा कृतज्ञतेच्या भावनेवर भर द्या. आरोग्याचा विचार करता, तुमच्या भावनिक स्वास्थ्यासाठी काही विश्रांतीचे टप्पे घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. LUCKY Crystal – Fluorite LUCKY Color – Marine Greeen LUCKY Number - 8

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात