सोलापूर, 2 जानेवारी : सिद्धेश्वर मंदिर ही सोलापूरची एक प्रमुख ओळख आहे. जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरची यात्रा असते. संक्रातीच्या दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असतो. या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यांमधील अनेक भाविकही इथं गर्दी करतात. या मंदिराच्या इतिहासाबद्दल आपण माहिती घेऊ या
पेशवेकालीन मंदिर
सिद्धेश्वर मंदिराच्या सभोवतालचा परिसर हा 14 व्या शतकात पूर्ण केला असावा. तसंच सध्याचे मंदिर पेशवेकालीन आहे, असे मानले जाते. या मंदिरातील कमानी, बसके गुंबज, शिखरावर असणाऱ्या विशिष्ट मुर्ती आणि काही प्रमाणातील कोरीव काम हे सर्व पेशवेकालीन मंदिरामध्ये आढळते.
अन्य मंदिराप्रमाणे सिद्धेश्वर मंदिराचे तोंडही पूर्वेकडं आहे. गर्भग्रह ,अंतराळ आणि मंडप अशी रचना आहे. मंदिराच्या मध्यभागी कोणतेही खांब नाहीत. नव्या मंदिराच्या पुढच्या अंगणाचे बांधकाम हे आप्पासाहेब वारद यांनी 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण केले. सोलापूरचे अष्टविनायक आणि भैरव यांची स्थापना सिद्धरामेश्वर यांनी केली. ज्या रागवंकांनी सिद्धेश्वरांचे चरित्र लिहिले त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे त्यापैकी ज्यावेळी किल्ल्याचे बांधकाम चालू होते त्यावेळी ह्या 16 लिंगांची रचना केली असावी. आणि सतरावे लिंग हे तेलेश्वर म्हणजेच नॉर्थकोटच्या मागच्या बाजूस असणारे लिंग मंदिर येथे बांधण्यात आले. अशी माहिती वास्तुविशारद आणि इंटक सहसमन्विका श्वेता कोठावळे यांनी दिली.
सिद्धेश्वर यात्रेचे सोलापूरला वेध, नंदीकोल उचलण्याचा सराव सुरू, Video
पाणी टंचाईवर तोडगा
1150 च्या आसपास सोलापूर म्हणजेच तेव्हाच्या सोन्नलगी गावात दुष्काळ पडला होता. त्यानेळी त्यातील चामलादेवी यांनी सिद्धरामेश्वर यांना तलावासाठी जागा देण्याची विनंती केली. तलावामुळे पाणी मिळेल तसंच हे काम करणाऱ्यांना रोजगार मिळेल असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर बहामनी सुलतानाचे राज्य असताना सोलापुरात तलावाच्या शेजारी किल्ला बांधावा त्यामधील मोटद्धवारे किल्ल्याला पाणी देता येईल,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये तलावाच्या शेजारीच किल्ला बांधला.
सोलापूरकरांना आजही पाण्याची टंचाई जाणवते. सोलापूरकरांची ही अडचण ओळखून सिद्धेश्वर महाराजांनी हा तलाव उभा केला. त्यांचा मानवतावादी दृष्टीकोन यामधून दिसतो. चारही बाजूंना तलाव आणि मध्यभागी मंदिर अशी रचना असलेले सिद्धेश्वर मंदिर हा सोलापूरचा सांस्कृतिक ठेवा आहे.
यात्रेची अख्यायिका
श्री सिध्दाराम हे ब्रम्हचारी असल्याने त्यांनी या लग्नास नकार दिला आणि त्यांच्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले. हा प्रतीकात्मक विवाह कार्यक्रम दरवर्षी सिध्देश्वर यात्रा म्हणून केला जातो. मकर संक्रांतीच्या काळात भोगी, संक्रांती आणि किंक्रांती ह्या तीन दिवसांमध्ये हा कार्यक्रम होतो. नंदी ध्वज हे विवाहासाठी प्रतीकात्मक वर आणि वधू मानले जातात.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.