मुंबई, 13 जुलै : हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला (Guru Purnima) खूप महत्व आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी महर्षी वेद व्यास (Maharshi Ved Vyas) यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाभारत, पुराणकथा लिहिल्या. यावर्षी गुरुपौर्णिमा 13 जुलै म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी मनोभावे गुरुची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. वृंदावन येथील आचार्य प्रथमेश गोस्वामी यांनी यावर्षी गुरुपौर्णिमेचे महत्व (Importance of Guru Purnima), शुभ मुहुर्त आणि विधि याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबतच आज आपण हेही जाणून घेणार आहोत की, या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त पौर्णिमा प्रारंभ - 13 जुलै, पहाटे 4 वाजेपासून पौर्णिमा समाप्ती - 14 जुलै रात्री 12 वाजून 6 मिनिटे गुरुपौर्णिमेचे महत्व गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमादेखील संबोधले जाते. महर्षि वेद व्यास यांना वेदांचे ज्ञान होते. हिंदू धर्मात महर्षी वेद व्यास यांना सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते. म्हणजेच ते अमर आहेत आणि आजही जिवंत आहेत. धार्मिक ग्रंथांमध्ये महर्षि वेद व्यास यांना विष्णु देवाचे (Looard Vishnu) रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पूजा-पाठ केल्याने आणि उपवास केल्याने कुंडलीतील गुरु दोष आणि पितृदोष संपतात. सोबतच नोकरी, बिझनेस आणि करियरमध्ये यश मिळते आणि प्रगती होते. तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश गुरुपौर्णिमेला या पद्धतीने करा पूजा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि अंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकावे. त्यांनतर स्वच कपडे घालून देवघराची साफसफाई करावी. त्यानंतर तिथे थोडे गंगा जल शिंपडावे. त्यानंतर गुरुचे स्मरण करावे आणि विष्णु देवाची पूजा करावी.
Shravan 2022 : कधीपासून सुरू होतोय श्रावण महिना? यंदा श्रावणात किती सोमवार?गुरुपौर्णिमेला करा या मंत्राचे पठण ओम गुरुभ्यो नमः ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः ओम वेदाहि गुरु देवाय विद्यहे परम गुरुवे धीमहि तन्नोः प्रचोदयात्ओ म गुं गुरुभ्यो नमः