जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shravan 2022 : कधीपासून सुरू होतोय श्रावण महिना? यंदा श्रावणात किती सोमवार?

Shravan 2022 : कधीपासून सुरू होतोय श्रावण महिना? यंदा श्रावणात किती सोमवार?

Shravan 2022 : कधीपासून सुरू होतोय श्रावण महिना? यंदा श्रावणात किती सोमवार?

श्रावण महिना (Shravan 2022) सुरू झाला की सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असते. तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. श्रावणात महादेवाची पूजा (Worship of Lord Shiva) करण्याला विशेष महत्त्व आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : यंदा श्रावण महिना 29 जुलैपासून (Shravan 2022) सुरू होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना आहे. श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असते. तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व (Shravan Month Significance) देखील आहे. श्रावणात महादेवाची पूजा (Worship of Lord Shiva) करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात (Importance of Shravan) अशी धार्मिक श्रद्धा आहे. उत्तर भारतासाठी 14 जुलै रोजी सुरू होईल तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील लोक 29 जुलैपासून (Shravan 2022 Date) श्रावण महिना साजरा करतील. श्रावण महिन्याचे महत्व (Importance Of Shravan Month) श्रावण महिन्यात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी मोठी तपशर्या केली होती, त्यामुळे हा महिना महादेवाला अतिशय प्रिय आहे अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात सोमावारी महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करताना जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यालाही विशेष महत्त्व आहे. ज्यांना या दिवशी पूजा करणे शक्य नसेल ते मनोभावे बेलपत्र वाहू शकता, असे केल्यानेही शिवपूजेचे पुण्य प्राप्त अशी मान्यता आहे. यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत? श्रावण महिन्यात अनेकदा 5 सोमवार देखील असतात, परंतु यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार आहेत. - पहिला श्रावण सोमवार - 01 ऑगस्ट 2022 - दुसरा श्रावण सोमवार - 08 ऑगस्ट 2022 - तिसरा श्रावण सोमवार - 15 ऑगस्ट 2022 - चौथा श्रावण सोमवार - 22 ऑगस्ट 2022

तुमच्याही घरात या वस्तू असतील तर लगेच घराबाहेर फेका; अन्यथा घरात येईल दारिद्य आणि अपयश

कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ? श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहण्याची विधी आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी वेगळी शिवमूठ वाहिली जाते. जाणून घेऊया कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ महादेवाला वाहावी? - पहिला श्रावण सोमवार - तांदूळ - दुसरा श्रावण सोमवार - तीळ

Brain tumor symptoms: डोकेदुखीची ही 2 लक्षणे कधीही दुर्लक्षू नका; ब्रेन ट्यूमरचे आहेत संकेत

- तिसरा श्रावण सोमवार - मूग - चौथा श्रावण सोमवार - जवस

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात