नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : सोन्याचे दागिने हा खासकरून महिलांचा आवडीचा विषय असतो. सणासुदीला अनेक जणी सोन्याचे दागिने विकत घेतात. प्राचीन काळापासून भारतात सोनं-चांदी यांबद्दल एक आकर्षण आहे. महिला आणि पुरुष दोघंही दागिने घालतात; पण तुम्ही कधी कुणाला पायात सोन्याचा दागिना घातलेलं पाहिलंय? नक्कीच नाही. यामागची कारणं जाणून घेऊ या. सोनं आणि चांदीची किंमत दिवसेंदिवस वाढतेच आहे. तरीदेखील सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर फारसा परिणाम दिसत नाही. भारतात सोनं-चांदी विशिष्ट दिवशी विकत घेणं शुभ मानलं जातं. एकंदरीतच दागिन्यांची लोकप्रियता मोठी आहे. दागिने कुठे आणि का परिधान करावेत, याचेही काही संकेत आहेत. यासाठीच कोणताही सोन्याचा दागिना पायात घातला जात नाही. त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या. ओढवून घ्याल भगवान विष्णूंची नाराजी सोन्याचे दागिने पायात न घालण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण धार्मिक आहे. सनातन धर्मानुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला सोनं प्रिय आहे. यासाठीच सोन्याचा कुठलाही दागिना कमरेच्या खाली घातला जात नाही. पायाच्या बोटात किंवा कंबरेखाली सोन्याचा दागिना घालणं हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो. यामुळे ते नाराज होतात, अशी श्रद्धा आहे. परिणामी, भौतिक सुखाची हानी होऊ शकते. G old Price Today: सणासुदीत सोने खरेदीची संधी! सोन्या-चांदीच्या किमती झाल्या कमी दागिने पायात घातल्यास होतात खराब सोन्याचे दागिने पायात घातल्याने धूळ-माती यामुळे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोन्याची तकाकी कमी होते. याउलट गळ्यात, नाकात परिधान केल्यास सोन्याचे दागिने अशा प्रकारे खराब होण्याचा धोका टळतो. तसंच व्यक्तीच्या चेहर्यावर तेजही दिसते. सोनं परिधान केल्याने व्यक्तिमत्त्व उठावदार होण्यास मदत होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राजधानीत सोनं महागलं! मुंबईतील दरात मात्र.. शास्त्रीय कारणही आहे वरच्या कारणांव्यतिरिक्त आणखीही एक कारण आहे आणि ते शास्त्रीय आहे. मानवाच्या शरीराच्या रचनेनुसार कमरेपासून चेहर्यापर्यंतच्या भागाला उबदारपणाची गरज असते. तसंच कमरेपासून शरीराच्या खालच्या भागाला थंडावा आवश्यक असतो. सोन्याचे दागिने घातल्याने शरीरातल्या ऊर्जेचं प्रमाण खूप वाढतं. तसंच, चांदीचे दागिने थंडावा देतात. म्हणून चांदीचे दागिने पायाच्या बोटात किंवा पायात घालणं उपयुक्त ठरतं; मात्र सोन्याचे दागिने पायात घातल्यास हानिकारक ठरू शकतं. यासाठीच चांदीचे दागिने पायात घातले जातात. त्यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.