मुंबई, 26 सप्टेंबर : शक्तीच्या उपासनेचा सण शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. पुढील 9 दिवस दुर्गा देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 138 रुपयांनी किरकोळ वाढला. तर चांदीच्या दरात आज 224 रुपयांची वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. तर मुंबई सराफा बाजारात सोन्याच्या भावात आज कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे? दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 138 रुपयांनी वाढून 49,786 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यामुळे मागील व्यवहारात सोने 49,648 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर मुंबई सराफा बाजारा 24 कॅरेट सोन्याचा दर 50200 वर बंद झाला. आज चांदीची किंमत किती झाली? त्याचप्रमाणे चांदीचा भावही 224 रुपयांनी वाढून 56,514 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीचा मागील बंद भाव 56,290 रुपये प्रति किलो होता. वाचा - बायकोला गिफ्ट किंवा लग्नासाठी खरेदी करायचे दागिने, डॉलर घेऊन आलाय गुडन्यूज सोन्याचे दर जाणून घेणे खूप सोपे आता सोन्याचे बाजार तुम्ही घरबसल्या पाहू शकता, तेही काही सेकंदात. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट रेट्स पाहू शकता. सोन्याची शुद्धता कशी तपासायची तुम्ही घरबसल्या बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता. सोन्याचा परवाना क्रमांक, हॉलमार्क किंवा नोंदणी क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही थेट सरकारकडे तक्रार करू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी काय कारवाई केली, याचीही माहिती मिळेल.
देशाच्या सोन्याच्या साठ्यात घट विशेष म्हणजे, 16 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 45.8 कोटी डॉलर घसरून 38.186 अब्ज डॉलर राहिला आहे. तर 9 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 34 कोटी डॉलर वाढून 38.64 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 2 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 38.303 अब्ज डॉलर होता.