मुंबई, 27 सप्टेंबर : सोमवारपासून देशभरात शारदीय नवरात्री महोत्सवर सुरू झाला आहे. या शुभमुहूर्तावर अनेकांना सोनं-चांदी खेरदी करण्याची इच्छा असते. जर तुम्हीही त्यापैकी असाल तर आज सोन्याचा भाव थोडा घसरला आहे. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 195 रुपयांनी घसरून 49,580 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोमवारी सोन्याचा भाव किरकोळ वाढीसह 49,775 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याच वेळी, चांदीबद्दल बोलायचं झालं तर त्यातही 195 रुपयांची घसरण झाली आणि ती 56,155 रुपये प्रति किलोवर पोहोचली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,637 डॉलर प्रति औंस होता. त्याच वेळी, चांदीचा भाव 18.69 डॉलर प्रति औंस राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, “हंगामी मागणीत वाढ झाल्यामुळे ज्वेलर्सकडे सोन्याची मागणी वाढली आहे. वास्तविक, बॉन्ड यील्ड्स आणि मजबूत डॉलरमुळे सोन्यावर दबाव राहिला. सोन्याची शुद्धता कशी तपासायची? केंद्र सरकारने जारी केलेल्या बीआयएस केअर अॅपद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही खरेदी केलेले सोने खरे आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला सोन्याच्या गुणवत्तेबद्दल शंका असेल तर तुम्ही त्याची माहिती अॅपवर टाकू शकता आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून सोने खरेदी केले आहे त्या ठिकाणाबाबत तक्रारही करू शकता. तुमच्या तक्रारीवर संबंधित विभागाने केलेल्या कारवाईचीही माहिती मिळेल. वाचा - हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी, मिळू शकतो 58% बंपर रिटर्न शेअर बाजारात दिलासा नाही मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली. या आठवड्यात बाजार सलग दुसऱ्यांदा घसरणीवर बंद झाला. विशेष म्हणजे फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील बाजारांची स्थिती बिकट झाली आहे. मात्र, आज आशियाई बाजारात किंचित वाढ दिसून आली. देशांतर्गत शेअर बाजारानेही चांगली सुरुवात केली पण फायदा टिकवून ठेवता आला नाही. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 37.70 अंकांनी (-0.07 टक्के) घसरून 57,107.52 वर बंद झाला. तर निफ्टी 8.90 अंकांच्या (-0.05 टक्के) घसरणीसह 17,007.40 च्या जवळपास मागील स्तरावर बंद झाला. हिरो मोटोकॉर्प (-2.88 टक्के), अदानी पोर्ट्स (-1.96 टक्के) आणि टायटन (-1.91 टक्के) निफ्टी आजच्या व्यवहारात सर्वाधिक घसरले. दुसरीकडे विक्रमी पातळीवर घसरल्यानंतर रुपयाने आज थोडीशी सुधारणा केली. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी 81.58 वर बंद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.