मराठी बातम्या /बातम्या /religion /Video: आरती सुरू झाली अन् बकरा देवासमोर नतमस्तक, पाहणारे भाविक झाले आश्चर्यचकीत

Video: आरती सुरू झाली अन् बकरा देवासमोर नतमस्तक, पाहणारे भाविक झाले आश्चर्यचकीत

मंदिरात आरती सुरू असताना एक बकरा देवासमोर गुडघे टेकून नतमस्तक झाला आणि पाहणारे अवाक् झाले. एका भाविकाने केलेला हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.

मंदिरात आरती सुरू असताना एक बकरा देवासमोर गुडघे टेकून नतमस्तक झाला आणि पाहणारे अवाक् झाले. एका भाविकाने केलेला हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.

मंदिरात आरती सुरू असताना एक बकरा देवासमोर गुडघे टेकून नतमस्तक झाला आणि पाहणारे अवाक् झाले. एका भाविकाने केलेला हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : मंदिरामध्ये आरती, पूजा सुरू असताना एखादा मुका प्राणी येऊन चक्क माणसाप्रमाणे देवाला नमस्कार करू लागला तर काय होईल. सर्वांनाच नक्की आश्चर्य वाटेल, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मंदिरात आरती सुरू असताना एक बकरा देवासमोर गुडघे टेकून नतमस्तक झाला आणि पाहणारे अवाक् झाले. एका भाविकाने केलेला हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.

बकरा देवाला नमस्कार करताना पाहुन लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी तर देवाचा महिमा अगाध असल्याचे म्हटले. कानपूरच्या बाबा आनंदेश्वर मंदिर (परमट) येथे संध्या आरतीवेळी भक्तीचे अनोखे रूप पाहायला मिळाले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक बकरा वाकून नमस्कार करण्याच्या मुद्रेत उभा असल्याचे दिसले. भाविक देवाचे नामस्मरण करत असताना त्यांच्यामध्ये हा बकरा नमस्कार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप चर्चेचा विषय ठरला आहे.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

परमट मंदिरातून शनिवारी एक अप्रतिम दृश्य समोर आले. बाबा आनंदेश्वरांच्या आरतीत एक बकरा गुडघ्यावर टेकून परमेश्वराला नमस्कार करताना दिसला. गर्भगृहाबाहेर भाविकांसह शिवलिंगासमोर नमस्कार करणारा बकरा मंदिरातील भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. यावेळी काही भाविकांनी त्याचा व्हिडिओही बनवला.

सकाळपासूनच मंदिराच्या आवारात बकऱ्यांचे दर्शन होत असते, असे लक्ष्मी नावाच्या भाविक महिलेलने सांगितले. गंगेच्या तीरामुळे मंदिराच्या आवारात गायी, बकऱ्यांचे दर्शन घडते. मात्र, सायंकाळच्या आरतीवेळी भक्तीत लीन झालेला हा बकरा कुतूहलाचा विषय ठरला, असे त्या म्हणाल्या. एका भक्ताने आरती करताना बकरा गुडघ्या टेकून नमस्कार करत असल्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. तो आता खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका भक्ताप्रमाणे बकरा भगवान भोलेनाथला नमस्कार करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Goat, Religion