जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Ganesh Visarjan 2022: लाडक्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन, योग्य विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

Ganesh Visarjan 2022: लाडक्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन, योग्य विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

विनायक चतुर्थी

विनायक चतुर्थी

10 दिवस आनंदात-उत्साहात गेल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे आणि नियमानुसार मुहूर्तावर गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 सप्टेंबर : गणेश चतुर्थीच्या दिवसापासून श्रीगणेश आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान झाले. 10 दिवस आनंदात-उत्साहात गेल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे आणि नियमानुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. लोक दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि नऊ दिवस गणेशाची स्थापना करतात आणि नंतर त्याला शुभ मुहूर्तावर निरोप देतात. बाप्पाची नऊ दिवस घरात किंवा सार्वजनिक मंडपात प्रतिष्ठापना केल्यानंतर चतुर्दशीला दहाव्या दिवशी मोठ्या उत्साहाने निरोप देण्याची तयारी सुरू आहे. गणेश विसर्जन का करावे - काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, गणेशजींनी सलग 10 दिवस महाभारत रचले होते, त्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले होते, त्यानंतर वेद व्यासजींनी त्यांना एका जलस्त्रोतावर नेले आणि तेथे पाण्यात स्नान केले. त्यामुळे गणेशजींना मोठा दिलासा मिळाला. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. तेव्हापासून या तिथीला गणेशजींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, जेव्हा आपण देवी-देवतांची मूर्तीच्या रूपात पूजा करतो, तेव्हा आपण त्यांना त्यांच्या जगातून बोलावतो आणि पूजा संपल्यावर आपण त्यांचे विसर्जन करतो, त्यांना निरोप देतो जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या लोकांकडे परत जातील. गणेश विसर्जन मुहूर्त 2022 - यंदा गणेश विसर्जन शुक्रवार, 09 सप्टेंबर रोजी सालाबादप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे. गणेश विसर्जनाची सकाळची शुभ वेळ: सकाळी 06:03 ते 10:44 दुपारी गणेश विसर्जनाची शुभ वेळ: दुपारी 12.18 ते दुपारी 1.52 संध्याकाळी गणपती विसर्जनासाठी मुहूर्त: संध्याकाळी 05:06 ते 06.31 पर्यंत हे वाचा -  गणपतीला वाहिलेल्या दुर्वांचा असा करा उपयोग, होईल आर्थिक भरभराट गणेश विसर्जनाची पद्धत - अनंत चतुर्दशीला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्या. विसर्जनास नेते वेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या मूर्ती मचानावर (शुद्ध-पवित्र केलेल्या). त्यावर पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर स्वस्तिक बनवावे. त्यानंतर गणेशजींना ढोल-ताशांच्या गजरात पूजास्थळावरून उचलून त्यांना एखाद्या टपावर किंवा व्यासपीठावर बसवले जाते. हे वाचा -   Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला चंद्र का पाहायचा नसतो? त्यापाठीमागे अशी आहे कथा आता बाप्पाची फुले, फळे, मोदक, चंदन, कुंकू इत्यादींनी पूजा करा. मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जा. तेथे बाप्पाची आरती करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. मग बाप्पाला सांगा की या वर्षी येऊन तुम्ही ज्या प्रकारे आयुष्यात आनंद दिलात, त्याच प्रकारे पुढच्या वर्षीही आमच्या घरी या. उपासनेत झालेल्या उणिवा आणि चुकांबद्दल माफी मागावी. नंतर मूर्ती पाण्यात विसर्जित करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात