मुंबई, 26 नोव्हेंबर : मार्गशीर्ष महिन्याची विनायक चतुर्थी 27 नोव्हेंबर रोजी रविवारी आहे. या दिवशी श्रीगणेशाची आराधना करावी व उपवास करावा. विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा करिअरमध्ये प्रगतीसाठी काही सोपे उपाय करू शकता, यामुळे विघ्नहर्ता गणेश प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून विनायक चतुर्थीच्या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊया.
विनायक चतुर्थी 2022 मुहूर्त
विनायक चतुर्थीची तारीख : 26 नोव्हेंबर संध्याकाळी 07:28 ते 27 नोव्हेंबर संध्याकाळी 04:25
विनायक चतुर्थी पूजा मुहूर्त : 27 नोव्हेंबर सकाळी 11:06 ते दुपारी 01:12
विनायक चतुर्थीसाठी उपाय
1. इच्छा पूर्तीसाठी
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून परंपरेनुसार गणेशाची पूजा करावी. त्या वेळी गणपती बाप्पाच्या कपाळावर लाल सिंदूर लावा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करा. यामुळे प्रसन्न होऊन गणेश तुमच्या मनोकामना पूर्ण करेल.
सिंदूरम् शोभनम् रक्तम् सौभाग्यम् सुखवर्धनम्।
शुभं कामदन चैव सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥
2. करिअरच्या प्रगतीसाठी
विनायक चतुर्थीच्या दिवशी करिअरमध्ये प्रगतीसाठी हळदीचे उपाय करा. पूजेच्या वेळी गणेशाला 5 गांठ हळद अर्पण करा. यावेळी श्री गणाधिपतये नमः मंत्राचा जप करा. हा उपाय तुम्ही दर बुधवारी देखील करू शकता.
3. व्यवसायातील प्रगतीसाठी
विनायक चतुर्थीच्या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायासाचे कार्यालय असलेल्या ठिकाणी उभ्या स्थितीत गणेशाची मूर्ती स्थापित करा. त्याचे पाय जमिनीला स्पर्श करू दे. असे केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात स्थिरता आणि प्रगती मिळेल.
4. संपत्ती-धान्य वाढीसाठी
चतुर्थीच्या दिवशी प्रथम गणेशाची पूजा करावी. त्यानंतर गणेशजींच्या ओम हस्ति पिशाचिनी स्वाहा या मंत्राची किमान एक माळ किंवा 108 वेळा जप करा. गणपतीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत वाढ होईल.
5. अडथळे दूर करण्यासाठी
विनायक चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरातील किंवा कोणत्याही गणपतीच्या मंदिरात गणेशाला किमान 21 दुर्वा अर्पण करा. गणेशाच्या मस्तकावर त्या अर्पण कराव्या. यानंतर गुळाचे 21 छोटे लाडू करून बाप्पाला अर्पण करावेत. त्याच्या कृपेने तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील.
6. सुख-समृद्धी आणि प्रगतीसाठी
चतुर्थीला गणेशाची पूजा करताना त्याला मोदक अर्पण करावेत. मोदक नसल्यास मुगाचे लाडू द्यावेत. हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत. त्याच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख-समृद्धी सोबत प्रगती होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganesh chaturthi, Religion