मुंबई, 05 ऑक्टोबर : आज देशभरात दसऱ्याचा सण साजरा होत आहे. अधर्मावर धर्माचा विजय आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी शस्त्रांची पूजा करून दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा नियम आहे. ज्यांनी आपल्या घरी नवरात्री कलशाची स्थापना केली आहे किंवा दुर्गा मूर्तीची स्थापना केली आहे, ते आज दसऱ्याच्या दिवशी त्यांचे विसर्जन करतील, देवी दुर्गा आपले माहेरचे घर सोडून सासरच्या घरी म्हणजेच कैलास पर्वतावर आपल्या कुटुंबीयांमध्ये जाते. देवी दुर्गा आश्विन शुक्ल प्रतिपदेला पृथ्वी ग्रहावर येते आणि 09 दिवस राहून दशमीला परत जाते. विजयादशमीला शस्त्रपूजन आणि दुर्गा विसर्जनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया. विजया दशमी दसरा काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, काशी विश्वनाथ ऋषिकेश पंचांगाच्या आधारे अश्विन शुक्ल दशमी तिथी मंगळवारी 04 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.27 वाजल्यापासून सुरू झाली होती आणि ही तिथी आज 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.09 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार आज दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. दसरा शस्त्र पूजा मुहूर्त 2022 - आज दसऱ्याला शस्त्रपूजनाचा नियम आहे. दशमी तिथी आहे तोपर्यंत तुम्ही सकाळपासून 11:09 वाजेपर्यंत शस्त्रपूजा करू शकता. मात्र, या दिवशी विजय मुहूर्तावरही पूजा करता येते. आज विजय मुहूर्त दुपारी 02:07 ते 02:54 पर्यंत आहे. शस्त्रपूजेसाठी शुभ मुहूर्त - आज सकाळी 06:16 ते 07:44 पर्यंत - लाभ आणि प्रगतीचा शुभ चोघडिया मुहूर्त आज सकाळी 07:44 ते 09:13 पर्यंत- अमृत-उत्तम चोघडिया मुहूर्त आज सकाळी 10:41 ते दुपारी 12:09 पर्यंत- शुभ-उत्तम चोघडिया मुहूर्त आज दुपारी 03:06 ते 04:34 पर्यंत- चार-सामान्य चोघडिया मुहूर्त आज दुपारी 04:34 ते 06:03 पर्यंत- लाभ-उन्नती चोघडिया मुहूर्त
दुर्गा विसर्जन 2022 चा शुभ मुहूर्त - दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गा विसर्जनाचा शुभ मुहूर्त आज सूर्योदयानंतर सकाळी 11.09 पर्यंत आहे. यावेळात विसर्जन करणे होत नसल्यास किमान स्थापन केलेल्या जागेवरून यावेळात मूर्ती हलवावी. नंतर दिवसभरात पद्धतशीरपणे विसर्जित करा. हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण रावण दहन मुहूर्त 2022 प्रदोष काळात दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पुतळ्याच्या दहनाची अचूक वेळ सूर्यास्तापासून रात्री 08:30 पर्यंत आहे. यावेळी पुतळ्याचे दहन करावे.