मुंबई, 24 मार्च: देवी भगवतीची उपासना करण्यासाठी नवरात्र हा सर्वात शुभ काळ मानला जातो. या 9 दिवसांत भगवतीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रात असेही सांगितले आहे की, नवरात्रीमध्ये दान केल्याने सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात. नवरात्रीमध्ये कोणत्या वस्तूंचे दान केल्याने सुख-समृद्धी येते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो, हे जाणून घेऊया...
ज्योतिषी सांगतात की, नवरात्रीच्या काळात माता जगत जननी जगदंबा देवलोकातून येऊन पृथ्वीवर वास करते. या काळात अविवाहित मुलींना कपडे दान करणे, लाल बांगड्या दान करणे, पुस्तके दान करणे, फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
पुस्तकेही करा दान
अविवाहित मुलींना अन्नदान करून त्यांना विविध वस्तू दान केल्याने नऊ दुर्गा प्रसन्न होतात, तर दुसरीकडे चैत्र नवरात्रीच्या काळात ग्रंथ दान करणेही खूप शुभ मानले जाते. पुस्तके दान केल्याने जीवनात कोणत्याही व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागत नाही. माता सरस्वती माता लक्ष्मीच्या सोबत राहते.
आई जगदंबेला कसे प्रसन्न करावे
पुष्कळ वेळा असेदेखील घडते की लोक पूजा अत्यंत पद्धतशीरपणे करतात, पण त्यांच्यावर दुःखाची छाया वाढत जाते. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या 9 दिवसांत जगतजननी जगदंबेला हिरव्या कपड्यात छोटी वेलची दान करावी. असे केल्याने आलेल्या सर्व संकटांचा नाश होतो. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
केळी दान करा
दुसरीकडे, नवरात्रीमध्ये केळी दान करणेदेखील खूप शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये केळी दान केल्याने घरावरील दैवी कृपा वाढते. पैसा वाढतो. नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान करणे खूप शुभ मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion