मुंबई, 18 मार्च: या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करण्यासोबतच व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. यासोबतच भाविकाला सुख-समृद्धीही प्राप्त होते. पापमोचनी एकादशीची तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या.
कधी आहे पापमोचनी एकाशी
तारीख - शनिवार, 18 मार्च 2023
एकादशी प्रारंभ 17 मार्च 2023 दुपारी 02.06 वाजेपासून आणि समाप्ती 18 मार्च 2023 सकाळी 11.13 वाजता.
पापमोचनी एकादशीचे महत्त्व
पद्मपुराणानुसार एकादशीला भगवान विष्णूचेच स्वरूप मानले जाते. या दिवशी उपवास केल्याने सांसारिक सुखांचा उपभोग घेण्याबरोबरच मृत्यूनंतर स्वर्गीय निवास प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास ब्रह्महत्या, सोने चोरी, मद्य प्राशन आदी पापांपासून मुक्ती मिळते.
पापमोचनी एकादशी पूजेची पद्धत
पापमोचनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्व कामांतून निवृत्त होऊन स्नान इत्यादी करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. यानंतर पूजा सुरू करावी. भगवान विष्णूला पाणी, पिवळे फूल, माला, चंदन, अक्षदा इत्यादी अर्पण करा. यानंतर केळीसह इतर भोग आणि तुळशीची पाने अर्पण करावी. यानंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. मंत्रासह एकादशी व्रत कथेचे पठण करावे. शेवटी विधिवत आरती करावी. एकादशीचे व्रत दिवसभर ठेवावे आणि द्वादशीच्या दिवशी दान करून उपवास सोडावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Ekadashi, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion