मुंबई 17 ऑक्टोबर : दिवाळी म्हटलं, की आनंद आणि उत्साहाला भरतं येतं. लोक आनंदाने आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करतात. दिवाळीची सुरूवात ही वसुबारसेपासून होते. वसुबारसेला गायीची पूजा केली जाते. पुढच्या दिवशी अर्थात धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. अश्चिन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी घरातील धान्याचीही पूजा केली जाते. तसेच या दिवशी धन्वंतरी जयंतीही असते. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. धन्वंतरींचीही पूजा केली जाते. भारतीय पुराणात असं म्हटलंय, की देवी लक्ष्मी या दिवशी कलश घेऊन प्रकट झाली. या दिवशी देवी लक्ष्मीचीही पूजा केली जातेच. पण सोन-चांदीही खरेदी केली जाते. दिवाळी च्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. तसंच धनत्रयोदशीलाही विशेष महत्त्व आहे. पण या दिवशी घरात पणत्या कुठे ठेवाव्यात याबद्दलही हिंदू धर्मशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचं पालन केल्यास तुमची अखंड भरभराट होते असं म्हटलं जातं. जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती. घराच्या ईशान्य दिशेला दिवा ठेवावा हिंदू धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशीला ईशान्य दिशेला तुपाचा दिवा लावणं लाभदायक आहे. पण हे तूप गायीच्या दुधाचं असावं. तुपाचा दिवा लावल्यास सर्व देवी-देवतांची आपल्यावर कृपादृष्टी राहते. तसंच देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते. धनत्रयोदशीला कापसाची वात लावू नये. त्याऐवजी लाल रंगाच्या वातीचा उपयोग करणं शुभ ठरतं. तसंच वातीत केशर वापरणं ही लाभदायक ठरतं. दिवा लावताना त्याखाली अक्षत ठेवून मगच दिवा लावावा. हे ही वाचा : Dhantrayodashi 2022 : धनत्रयोदशीला नक्की करा ‘या’ गोष्टी; पैशांची चणचण कधीच भासणार नाही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा धनत्रयोदशीला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. शास्त्राप्रमाणे, पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीसहित इतरही देवी-देवतांचा वास असतो. निर्मळ मनाने पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास घर धनधान्यांनी भरलेलं राहतं असं मानलं जातं. आयुष्यात तुम्हाला कधीच सुखाची कमतरता राहत नाही. घरात अखंड दीप तेवत ठेवावा धनत्रयोदशीचा दिवस हा सौख्याचा आणि समृद्धीच्या दृष्टीने शुभ मानला जातो. या दिवशी अखंड दिवा तेवत ठेवल्यास देवी लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते. तिच्या असण्याने भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षांची पूर्ती होते. या दिवशी अखंड दिवा तेवत ठेवल्यास वास्तू दोष नाहीसा होतो. तसंच आर्थिक सौख्याची वृद्धी होते. यासाठी धनत्रयोदशीला रात्री प्रदोष काळात दिवा तेवत ठेवणं आवश्यक ठरतं. तुपाचा दिवा ठेवल्यास शुभ असतं, नाहीतर मोहरीचं तेल घालून दिवा ठेवला तरी चालतं. बेलाच्या झाडाखाली दिवा लावावा आर्थिक संकटातून मुक्तता हवी असल्यास बेलाच्या झाडाखाली दिवा लावावा असं म्हटलं जातं. बेलाच्या झाडाखाली तेलाऐवजी तुपाचा दिवा लावणं लाभदायक ठरतं. हिंदू धर्मशास्त्रांप्रमाणे बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घराची भरभराट होते, सुखसमृद्धी राहते.
देवळात दिवा लावावा धनत्रयोदशीला देवळात देवांसमोर दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मीसहित इतर देवही तुमच्यावर प्रसन्न होतात. यासाठी तुपाचा दिवा लावणं हे हितकारक ठरतं.