जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Dhanteras 2022: धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा का केली जाते? त्यांच्या जन्माची अशी आहे कथा

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा का केली जाते? त्यांच्या जन्माची अशी आहे कथा

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा का केली जाते? त्यांच्या जन्माची अशी आहे कथा

भगवान धन्वंतरी हे महान वैद्य मानले जातात. लोककल्याणाच्या उद्देशाने त्यांचा जन्म झाला. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑक्टोबर : पाच दिवसीय दीपोत्सव म्हणजेच दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होणार आहे. यावर्षी 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा भांडी खरेदी करणे खूप शुभ असते. असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केल्याने वर्षभर समृद्धी येते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरींनी अवतार घेतला होता. हिंदू धर्मात भगवान धन्वंतरीला विष्णूचा अवतार मानले जाते. या दिवशी भगवान धन्वंतरीची भक्तिभावाने पूजा केल्याने दीर्घायुष्य आणि आरोग्याचे वरदान मिळते. जाणून घेऊया भगवान धन्वंतरीच्या जन्माशी संबंधित पौराणिक कथा. भगवान धन्वंतरीची कथा - पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान विष्णूंनी धन्वंतरी म्हणून अवतार घेतला. भगवान धन्वंतरी हातात अमृताने भरलेला कलश घेऊन महासागरातून प्रकट झाले होते, म्हणून धनत्रयोदशीला भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात भगवान धन्वंतरी यांना वैद्यम मानले जाते. भगवान धन्वंतरी हे महान वैद्य मानले जातात. लोककल्याणाच्या उद्देशाने त्यांचा जन्म झाला. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केल्याने ते 13 पट वाढते. पौराणिक कथेनुसार, धन्वा नावाच्या राजाला कठोर तपश्चर्या केल्यावर धन्वंतरी नावाचा मुलगा झाला.

News18लोकमत
News18लोकमत

भगवान धन्वंतरीला चार हात आहेत. त्यांच्या एका हातात आयुर्वेद ग्रंथ आणि दुसर्‍या हातात औषधाचे भांडे आहे. तिसर्‍या हातात वनौषधी आणि चौथ्या हातात शंख आहे. आयुर्वेदाचे जनक देखील भगवान धन्वंतरी मानले जातात. त्यामुळे धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्याचे वरदानही मिळते. धन्वंतरी पूजा विशेष फलदायी आहे. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू खूप शुभ असतात. हे वाचा -   दिवा विझणं खरंच अपशकुन आहे का? पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्या

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात